Breaking : आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून काढा पैसे; तेही चार्जेसविना!

ATM
ATM

Coronavirus : नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता ३ महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (ATM) तुम्ही पैसू काढू शकणार आहात. आणि त्यासाठी कोणतेही इतर चार्जेस आकारले जाणार नाहीत. तसेच या कालावधीत तुमच्या खात्यात ठराविक रक्कम शिल्लक असलीच पाहिजे, अशी कोणतीही अट लागू राहणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी (ता.२४) दिली. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते. 

यावेळी सरकारतर्फे अनेक घोषणाही करण्यात आल्या आहेत. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करण्याची तारीखही वाढवण्यात आली आहे. यासोबतच आईटीआर रिटर्न भरण्याची अंतिम मुदतही वाढविण्यात आली आहे. आता आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे आयकर भरण्याची अंतिम तारीख ३० जून असणार आहे. तरीही जे नागरिक वेळेत रिटर्न भरणार नाहीत, त्यांना अगोदर १२ टक्के व्याजदर आकारला जात होता. जो आता ९ टक्क्यांप्रमाणे आकारला जाणार आहे. 

तसेच टीडीएससाठीचा १८ टक्के व्याजदरही ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामण यांनी दिली. टीडाएस आणि रिटर्न फाईलवरील व्याजदर ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचा परिणाम शेअर मार्केटवर लगेच दिसून आला. सेन्सेक्सने ११०० पॉईंट तर निफ्टीने ३०० चा आकडा पार केला आहे. 

अर्थमंत्रालयाने घेतलेले निर्णय असे

  • आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जून
  • प्राप्तिकर भरण्याची मुदत आता 31 मार्च नाही तर, 30 जून
  • मार्च-एप्रिल-मे महिन्याचा जीएसटी भरण्याची मुदतही आता 30 जून
  • पाच कोटींच्या आतील उलाढाल असलेल्या कंपन्यांना, व्यवसायिकांन कोणताही दंड नाही
  • पाच कोटींच्यावरील उलाढाल असलेल्या कंपन्यांचा दंड 12 टक्क्यांवरून 9 टक्के
  • केंद्र सरकार पॅकेजची घोषणा लवकरच करणार : निर्मला सीतारामन

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय

देशातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सुमारे ५६० जिल्ह्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंत ५०० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ज्यामध्ये ४१ विदेशी नागरिकांचाही समावेश असून ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठई येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com