भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला कसा? किती खरं किती खोटं?

वृत्तसंस्था
Tuesday, 24 March 2020

सध्या देशात कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा सुरू आहे. जे परदेशातून आले आहेत आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, अशा सर्वांना सरकार आयसोलेशनमध्ये ठेवत आहे. 

Coronavirus : नवी दिल्ली : कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सरकारने संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. तरीदेखील लोक घराबाहेर पडत असून रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो राजस्थानच्या भीलवाडा भागातील असल्याचे म्हटले जात आहे. सध्या भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना लोकांवर लाठीचार्ज करावा लागत आहे. हे वृत्त किती खरे किती खोटे आहे याबाबत जाणून घेऊयात. 

बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस लोकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि तिथून निघताना पोलिस त्याच्यावर लाठीचार्ज करताना दिसून आले. तिथेच उभा असलेला एकजण होत जोडून पोलिसांना विनंती करताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना पोहोचल्याने कर्फ्यू लागू करण्यात आला. असे असतानाही लोक निर्लज्जासारखे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लाठीचार्जशिवाय पोलिसांपुढे दुसरा कोणता पर्याय नाही. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

राजस्थानच्या भीलवाडा आणि केरळमधील ज्या क्षेत्रात कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे, त्या सर्वांना कोरोनाची लागण नेमकी कुठे आणि कशी झाली. याचा अजूनही शोध लागला नाही. त्या सर्व कोरोनाग्रस्तांपैकी कुणीही परदेशी गेले नव्हते, हे विशेष. 

- WHO ने केले भारताचे कौतुक, लढाऊ वृत्तीला सलाम!

अख्ख्या देश कोरोनाच्या खाईत लोटू नये, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार कठोर कायद्यांची अंमलबजावणी करत आहे. सध्या देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. परदेशातून जे लोक येत आहेत, त्या सर्वांना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला तर नक्की कुणामुळे त्याचे संक्रमण होत आहे, हे ओळखणे अवघड होणार आहे.

Image may contain: one or more people and outdoor

हे सगळं ठीक. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं गाव हे भीलवाडा आहे? आणि खरंच तिथे कोरोनाची तिसरी स्टेज सुरू आहे? हा प्रश्न मागे राहतोच. कोरोनाची तिसरी स्टेज सुरू झाल्याने भीलवाडामधील २४ लाख लोकांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे, अशा प्रकारचे वृत्त एका वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते. रविवारपासून (ता. २२) देशात संचारबंदी लागू करण्यास सुरवात झाली. मात्र, त्या अगोदर एक दिवस शनिवारी (ता.२१) भीलवाडामध्ये ११ कोरोना पॉझिटिव्ह नागरिक आढळून आल्याने सन्नाटा पसरला होता. कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरवात झाली. 

- Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; आकडा गेला...

नेमकं खरं काय?

भीलवाडा हा कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याकडे चालला आहे. जिल्ह्यातील २८ लोक आयसोलेशनमध्ये असून त्यापैकी ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर ११ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. अनेक रुग्णांवर उपचार केल्यामुळे तीन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती भीलवाडा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

- Breaking : आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून काढा पैसे; तेही चार्जेसविना!

दरम्यान, खाजगी दवाखान्यातील ३ डॉक्टर आणि ९ परिचारिकासहित एकूण १३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. या १३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली याचा सुगावा अजूनपर्यंत लागला नाही. देशात सामुदायिकरित्या कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉ. रमन यांनी म्हटले आहे. मात्र, भीलवाडा येथील परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याची सुरवात झाल्याचे म्हणावे लागले.

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठई येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus reaching at third stage in Bhilwara Rajasthan is it truth