Corona Effect : शहरात भाज्यांचा तुटवडा; हिरवी मिरची १६० रुपये प्रति किलो!

vegetables
vegetables

मार्केट यार्ड : शहरासह, उपनगरात फळ व पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते भाज्या जास्त दराने विकत आहेत. सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले असून बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यत पोहोचले आहेत. पालेभाज्याच्या गड्डीचे दर 50 ते 30 रुपयांपर्यत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होतो आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील अडते आणि कामगार संघटनांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बाजार बंद ठेवला होता. त्यामुळे सोमवारी बाजारात अत्याअल्प आवक झाली होती. सतत चार दिवस भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दरांने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

त्यातच पुन्हा मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय अडते , चेंबर आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला मिळणार की नाही. या भीती पोटी मिळेल त्या किंमतीत ग्राहक भाजीपाला खरेदी करत आहे. मार्केट यार्ड बंद राहिले तर भाजीपाला, फळांचा आणि किराणा मालाचा तुटवडा निर्माण होणार आहे. याचाचा फायदा घेऊन किरकोळ विक्रेते वाटेल त्या भावात मनमानी पद्धतीने विक्री करत आहेत. प्रशासनाने यावर अंकुश आणण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना विषाणूच्या भीतीने शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला घाऊक बाजारात भाज्याच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व पेठा, शिवाजीनगर, कोथरुड, वारजे-माळवाडी, कोरेगावपार्क, कर्वेनगर, कात्रज, गोकुळ नगर, सुखसागरनगर, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर

भाज्या              दर
हिरवी मिरची     160
शेवगा               120
गवार                120
वाटाणा              120
दोडका              80
कोबी                 80
कांदा                 80
बटाटा                60
वांगी                  80
फ्लाॕवर               80

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 पालेभाज्यांचे दर (प्रति गड्डी)

कोथिंबीर             50
मुळा                   40
मेथी                    30
कांदापात             30
अंबाडी                30
चाकवत               30

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com