बारामतीतून एसटीच्या जादा गाड्या सोडल्या जाणार, कारण

मिलिंद संगई
Wednesday, 23 December 2020

नाताळ तसेच वर्षअखेरच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एसटीने बारामतीतून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती वरिष्ठ आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

बारामती : नाताळ तसेच वर्षअखेरच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर एसटीने बारामतीतून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती वरिष्ठ आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतून दुपारी दीड वाजता शिर्डीसाठी, दुपारी एक वाजता ठाणे (मुक्कामी बस), सकाळी सात वाजता दादर, साडेसहाला कोल्हापूर, सकाळी साडेसहा वाजता औरंगाबादसाठी जादा गाड्या सोडल्या  जाणार आहेत. सुटीनिमित्त गावी जाणा-या प्रवाशांचे हाल होऊ नयेत या उद्देशाने या गाड्या सोडल्या जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विनावाहक विनाथांबा पुणे गाडी सुरु...
दरम्यान बारामती पुणे बारामती या विनावाहक विनाथांबा गाड्या पुन्हा सुरु झाल्या असून दिवसभरात साध्या गाडीच्या 26 तर शिवशाही गाडीच्या 20 फे-या होत असल्याचेही गोंजारी यांनी सांगितले. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळू लागला आहे. 

दरम्यान बारामती आगारातून आता सरासरी दररोज 24 हजार कि.मी. गाड्या धावत असून सरासरी दररोज सहा लाखांचे उत्पन्न एसटीला मिळत आहे. मार्चपूर्वी हाच आकडा महिन्याला बारा लाखांइतका होता, याचाच अर्थ आता लाल परी 50 टक्क्यांपर्यंत रुळावर आली असून सुटीच्या काळात एसटीचे उत्पन्न अधिक वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाही एसटीने कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या मर्यांदांचे पालन केले असल्याचेही ते म्हणाले. 

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

एसटीही करतेय आता बारकाईने विचार...
एसटीचे वेगाने कमी होणारे भारमान हा चिंतेचा विषय असल्याने आगार पातळीवरही आता भारमान वाढविण्यासाठी उपाय योजले जात आहेत. एकाच मार्गावर गाड्या जास्त होत नाहीत ना, अवैध वाहतूक होते का, चालक वाहक ठरवून दिलेल्या थांब्यावर गाडी थांबवितात का, प्रवासी चढउतार किती व कशी होते याची माहिती गोळा केली जात आहे. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: planning to release extra ST trains from baramati