पुणे : अल्पसंख्याकांच्या विकासाबाबत मलिकांनी अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

आयटीआयचे कामकाज अधिक सक्षम होण्यासाठी अत्याधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

पुणे : अल्पसंख्याक नागरिकांच्या विकासासाठीच्या सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश अल्पसंख्याक विकास, औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग तसेच अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता. 1) नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी विश्रामगृहात बैठक झाली. सध्या सरकारी यंत्रणांबरोबरच खासगी कंपन्या, आस्थापनांमार्फत मेळावे आयोजित करण्यात येतात. या मेळाव्यांमधून अधिकाधिक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच अधिक गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरीय किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मलिक यांनी दिल्या. 

- Budget 2020 : '... तरंच माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थसंकल्पाचं स्वागत करेल' : रोहित पवार

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या पुणे विभागातील कामकाजाचा आढावा या वेळी घेण्यात आला. आदिवासी, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता केंद्रांचे कामकाज राज्यात चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आदिवासी विभागाकडून आवश्‍यक निधी प्राप्त करुन घेण्याविषयी प्रयत्न करावा. सर्व योजना एकछत्री स्वरुपात राबवून उद्योजकांच्या समन्वयाने आयटीआयचे कामकाज अधिक प्रभावी करण्यात यावे.

- पुणे : ... अन् पोलिसांच्या मदतीने महिलांनी रोखला बालविवाह!

तसेच, आयटीआयचे कामकाज अधिक सक्षम होण्यासाठी अत्याधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. वफ्फ बोर्डाच्या पुण्यातील जमिनीबाबत सुरु असलेल्या सर्व्हे संदर्भात अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याशी चर्चा करुन योग्य त्या सूचना केल्या. 

- Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीही नवीन नाही : सुप्रिया सुळे

अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण योजनांचा आढावा 

नवाब मलिक यांनी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाला भेट दिली. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, सायबर ग्राम योजना, आयडीएमआय योजना, एसपीएमक्‍यू योजना तसेच मराठी भाषा फौंडेशन योजनांचा आढावा मलिक यांनी घेतला.

या वेळी विभागाचे संचालक सुनील चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पूना कॉलेज येथे भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन ऍन्ड स्पोटर्स असोसिएशन आणि पूना कॉलेज यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्‌घाटन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plans for development of minorities should be implemented effectively says Nawab Malik