

पंतप्रधान मोदी हे राष्ट्रसेवा आणि समर्पणाचे प्रतीक
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांकडून ७६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली,ता.१७ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवास हा देशाचा विकास, लोककल्याण आणि सुशासनामधील त्यांच्या योगदानाचा असल्याची भावना आज त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना ७६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने आज ‘सेवा संकल्प अभियान’ या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेची सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी यांना ७६ व्या वाढदिवसानिमित्त आज केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील दीर्घ प्रवासातील योगदानाचा आवर्जून उल्लेख करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी हे अथक परिश्रम, त्याग आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. ज्यांनी कर्म हीच आपली साधना आणि राष्ट्रसेवा हेच आयुष्याचे ध्येय मानले आहे, त्यांचा हा सेवा आणि समर्पणाने भरलेला प्रवास करोडो देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तर, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनीही पंतप्रधान मोदी हे देशसेवा आणि समर्पणाचे प्रतीक असून १४० कोटी भारतीयांचे नेते आहेत, असे म्हणत त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह,
किरेन रिजीजू , सी. आर. पाटील यांच्यासह देशभरातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशसेवा आणि लोककल्याणासाठी समर्पित केला, असे पंतप्रधान मोदी हे एक ‘कर्मयोगी’ आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे १४० कोटी भारतीयांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत.
-पीयूष गोयल
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.