मन की बात : ...अन् पंतप्रधानांपर्यंत पोचली गोष्टींची गोष्ट!

Vaishali_Deshpande
Vaishali_Deshpande

पुणे : मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला चालना मिळावी, म्हणून लॉकडाउनमध्येच छान-छान गोष्टी सांगणारा "अस्मि गम्मत कट्टा' हा युट्यूब चॅनल आम्ही सुरू केला. आमच्या या गोष्टींची गोष्ट थेट पंतप्रधानांपर्यंत पोचेल आणि त्यावर ते "मन की बात'मध्ये बोलतील यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाही, अशा भावना वैशाली देशपांडे-व्यवहारे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बातम'ध्ये मानवी जीवनातील कथांचे महत्त्व सांगतले. हे सांगताना त्यांनी देशपांडे यांच्या मराठी कथांच्या यूट्यूब चॅनलचा उल्लेख केला. मुलांसाठीच्या या कामाची दखल अनपेक्षितपणे थेट पंतप्रधानांनीच घेणे त्यांच्यासह सहकाऱ्यांसाठी कौतुकाची थाप ठरली आहे. देशपांडे यांनी त्यांच्या आई डॉ. कल्पना व्यवहारे यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या "प्रोजेक्‍ट अस्मि'बद्दल सांगीतले.

त्या म्हणाल्या, "नागपुरातील आईचे घर विकून उभ्या राहिलेल्या पैशातून, पहिले ते दहावीच्या मुलांच्या भावविश्‍वाचा विकास करणारे उपक्रम आम्ही सुरू केले. लहान मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्याच्यासारखे लहान होत रमत गमत मानसिक विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही कार्यशाळाही घेतल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात मुलांना अधिक भावनिक आणि मानसिक आधाराची गरज होती. म्हणून सहकाऱ्यांच्या मदतीने अस्मि गम्मत कट्टा सुरू झाला.'' 

मागील तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या या कट्ट्याची 15 वी गोष्ट या रविवारी प्रदर्शित झाली. मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारा उपक्रम प्रत्येक गोष्टीनंतर सांगितला जातो. या उपक्रमात शुभदा काटदरे, संध्या झोपे, मिनल विध्वंस आणि दिपाली एकतारे यांचे सहकार्य लाभत असल्याचे देशपांडे सांगतात. 

तंत्रज्ञानाला पर्याय नाही :
तंत्रज्ञानाने मुलांच्या रोजच्या जगण्यात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासासाठी त्याचाआधार घेणे गरजेचे आहे, पण अतिरेकही व्हायला नको. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आदींच्या माध्यमातून मर्यादित स्वरूपात मुलांना गोष्टी सांगणे किंवा मानसिक विकासाच्या दृष्टीने आवश्‍यक उपक्रम द्यायला हवे. पुढे मात्र त्यांना मुक्तपणे विचार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. मुलांच्याच आई वडिलांची जबाबदारी अधिक असल्याचे, देशपांडे यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी उपक्रमाचे कौतुक केल्यावर आम्हाला काही कळेनासेच झाले. पण त्यांच्या या विश्‍वासाने आमच्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. मनापासून काम केल्यास फळ निश्‍चित मिळते हाच याचा प्रत्यय आहे. 
- वैशाली देशपांडे-व्यवहारे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com