esakal | पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी; प्रशासन लागले कामाला
sakal

बोलून बातमी शोधा

PM_Narendra_Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहगाव विमानतळ येथे विशेष विमानाने येतील. त्यानंतर ते तेथून हेलिकॉप्टरद्वारे सिरम इन्स्टिट्युटला भेट देतील.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी; प्रशासन लागले कामाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या सिरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) पुण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून सध्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे. 

बँकेतील कामे उरकून घ्या; डिसेंबरमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी​

जगभरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. भारतातही दिल्ली, केरळमध्येही कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाची लस केव्हा येणार याकडे कोट्यावधी भारतीयांसह जगभरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने सिरम इन्स्टिट्युमध्ये कोरोना लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यावर विविध देशांचे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्युटला शनिवारी भेट देणार आहेत. शनिवारी दुपारी एक ते दोन या वेळेत त्यांचा नियोजीत दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते सिरमला भेट देऊन कोरोनावरील लशीचा आढावा घेऊन तेथील वैज्ञानिक, डॉक्‍टर आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

'मी स्वतः उमेदवार आहे, असं समजून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा'; सुप्रिया सुळेंचं आवाहन

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर गुरूवारपासून वरिष्ठ पोलिस अधिकारी, दिल्लीतील तपास संस्था व पंतप्रधानांच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. तसेच त्यांच्या दौऱ्यानिमित्त रंगीत तालीमही घेण्यात येत आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून लोहगाव विमानतळ परिसर ते सिरम इन्स्टिट्युटमध्ये तपासणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावेळी राज्याचे पोलिस महासंचालक, पुणे पोलिस दलातील महत्वाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस उपायुक्त उपस्थित असणार आहेत. पोलिसांकडून पंतप्रधानांच्या सुरक्षिततेकडे प्राधान्याने लक्ष्य देण्यात येणार आहे. 

Nivar Cyclone: तिरुमला मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; मुसळधार पावसाने आंध्रात पूरस्थिती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहगाव विमानतळ येथे विशेष विमानाने येतील. त्यानंतर ते तेथून हेलिकॉप्टरद्वारे सिरम इन्स्टिट्युटला भेट देतील. त्यानंतर ते पुन्हा हेलिकॉप्टरद्वारे विमानतळ येथे पोचून विमानाने दिल्ली परत जाणार आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना वाहनाद्वारे सिरम इन्स्टिट्युटला जायचे असल्यास, त्यादृष्टीनेही पर्यायी मार्गाचा आखण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

loading image