कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा; विभागीय आयुक्तांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

 पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेणार आहेत. 

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेणार आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीच्या निर्मितीचं काम सुरु आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यात असेलल्या या लसीकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. या सर्व कामकाजाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. यासाठी पुणे प्रशासन तयारीला लागले आहे. पंतप्रधानांचा दौरा कसा असेल याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विभागीय आयुक्त सौरभ राव काय म्हणाले-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ नोव्हेंबरला पुण्यात हडपसरमधील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
- २८ नोव्हेंबरला दुपारी साडे बारा वाजता पुणे विमानतळावर पंतप्रधान पोहचतील त्यानंतर हेलिकॉप्टर मधून सिरमला इन्स्टिट्यूटला जातील
- हा एक तासाचा सिरम इन्स्टिट्यूट भेट असणार आहे,सिरमला इन्स्टिट्यूमध्ये कोरोना लसी बाबत माहिती घेणार आहेत.
- सुरक्षेसाठी एसपीजी टीम आलेली आहे,सुरक्षा दृष्टीने तयारी केली जात आहे
- कोरोनाबाबत काळजी घेऊन हा दौरा असणार आहे, त्याबाबतही काळजी घेण्यात आलेली आहे.
- त्या ठिकाणचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होणार आहेत.

हे वाचा - ऑगस्टपर्यंत 7.43 कोटी लोकांना कोरोना झाल्याची शक्यता; दुसऱ्या सिरो सर्व्हेचा रिपोर्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 100 देशांचे राजदूत सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. मात्र राजदूत 4 डिसेंबरला पुण्यात येणार असून सीरम इन्स्टिट्यूट आणि जिनिव्हा बायोफार्मासिटिकल या संस्थांना भेट देणार आहेत. यासाठीही प्रशासन तयारी करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi will visit serum institute full schedule here