विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; यंदा शाळांना 128 दिवस सुट्ट्या!

PMC-Schools
PMC-Schools

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील मनपा शाळांसह सर्व शाळांना 2020 मध्ये शाळेची घंटा केवळ 238 दिवसच वाजणार आहे. तर 128 सुट्ट्या असणार असून, यात सण-उत्सवासाठीच्या 31 दिवस सुट्ट्यांचा समावेश आहे.

2020 या वर्षाचे शाळांचे सुट्ट्यांचे नियोजन पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी केले असून, त्याबाबत सोमवारी परिपत्रक काढले आहे. हे शहरातील महापालिका, अनुदानीत, विनाअनुदानीत, स्वयंअर्थसहाय्यीत प्रार्थमीक व माध्यमिक शाळांना हे आदेश लागू असणार आहेत.

वर्षभरातील 365 दिवसांपैकी 238 दिवस शाळांचे कामकाज चालणार आहे. उर्वरित 128 दिवस शाळा बंद असतील. त्यामध्ये 52 रविवार, उन्हाळी सुट्ट्या 32 दिवस, दिवाळी सुट्ट्या 12 दिवस, सर्वसाधारण सुट्ट्या 31 दिवस, स्थानिक सुट्टी 1 दिवस अशा या सुट्ट्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी 30 एप्रिल ते 13 जून तर, शिक्षकांसाठी 8 मे ते 13 जून या कालावधीत राहणार आहे. दिवाळी सुट्ट्या 9 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत राहणार आहेत.

पुणे शहरातील मराठी शाळांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या सुट्ट्या लागू राहणार आहेत. खासगी शाळांना या ऐवजी इतर सुट्ट्यांचे नियोजन करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह महापालिकेची मान्यता घेणे अनिवार्य आहे. परवानगी न घेता अन्य दिवशी सुट्टी घेतल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर करावाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी मिनाक्षी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

आज आणि उद्या सुट्टी

महापालिकेने जाहीर केलेल्या आदेशानुसार, मंगळवारी (ता. 14) भोगी आणि बुधवारी (ता.15) मकरसंक्रांतीची सुट्टी जाहीर केली आहे. तर, जिल्हा परिषदेच्या शाळांना केवळ 15 जानेवारी रोजीच सुट्टी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com