शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव

संदीप जगदाळे
Sunday, 17 January 2021

शेवाळेवाडी ग्रामस्थांना गाव महापालिकेत गेल्याने गावाचा पायाभूत विकास होईल, अशी अपेक्षा आहे. अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा वाढत चालल्याचे शल्यही गावकऱ्यांना बोचत आहे.

झपाट्याने वाढणारे नागरीकरण, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, सांडपाणी, कचरा, अरुंद रस्ते यांसारख्या समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या शेवाळेवाडी ग्रामस्थांना गाव महापालिकेत गेल्याने गावाचा पायाभूत विकास होईल, अशी अपेक्षा आहे. अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा वाढत चालल्याचे शल्यही गावकऱ्यांना बोचत आहे.

मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची !

शेवाळेवाडी हे सोलापूर रस्त्यालगतचे टुमदार गाव.  फुरसुंगी कचरा डेपोमुळे गावातील जलस्तोत्र प्रदूषित झाली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यामुळे पुणे महापालिकेकडून २०, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १० टॅंकरद्वारे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, तर गावातील तीन पाणी योजनांद्वारे पाणी दिले जाते. 

महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!

टॅंकरद्वारे पाणी पुरवठा न करताना महापालिकेने बंद नळाद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. गावात दवाखाना नाही. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांकडे जाऊन रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे याठिकाणी सरकारी दवाखाना असावा, अशी अपेक्षा आहे. गावातील सांडपाणी वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी सांडपाणी थेट नाल्यात सोडले आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रकिया करण्याचा प्रकल्प या गावात महापालिकेने सुरू करणे आवश्‍यक आहे. गावात पथदिवे, रस्त्यांची कामे झालेली आहेत.

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

पूर्वी महापालिका गावचा कचरा स्वीकारत होती, आता मात्र तो स्वीकारला जात नाही. गावातील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येत नाही. तसेच उचललेला कचरा एका शेतात डंप केला जातो.

पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम 

गावातील शेतीपट्टा निवासी पट्ट्यात रूपांतरित केल्यास विकास होण्यास मदत होईल. महापालिकेने जुन्या बांधकामांची नोंद करावी, काही वर्षे मिळकतकर वाढवू नये. पूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये महापालिकेला सुविधा पुरवता आल्या नाहीत.   
- राहुल शेवाळे, माजी उपसरपंच

ग्रामस्थ म्हणतात...
ओंकार शेवाळे  ः  गावातील रस्ते अरुंद आहेत. याच रस्त्याने महापालिकेचे पाण्याचे टॅंकर भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.  

वाघोलीकरांना वेध विकासाचे

लतिका साठे (गृहिणी) ः  मी गेल्या दहा वर्षांपासून गावात राहते. बाराही महिने टॅंकरने पाणी घ्यावे लागते. कोणत्याही सुविधा नसल्या तरी आम्हाला ग्रामपंचायतीला कर भरावा लागतो. महापालिकेत गाव गेल्याने रस्ते, पाणी, कचरा, वीज आणि सांडपाण्याचा प्रश्न सुटेल असे वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टिक्षेपात...
१० हजार - लोकसंख्या 
२५६.३२  - हेक्‍टर क्षेत्रफळ
११ -  ग्रामपंचायत सदस्य
    
सरपंच - अशोक शिंदे
गावाचे वेगळेपण -  गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, कृषिग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामपंचायत ISO मानांकित आहे. 

(उद्याच्या अंकात वाचा  भिलारेवाडी गावाचा लेखाजोखा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc expansion merger 23-villages Shewalwadi