घरोब्यासाठी नक्की आशीर्वाद कोणाचा?

PMC-Issue
PMC-Issue

पुणे - महापालिकेच्या ताब्यातील घरांत काही आमदार आणि नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा प्रकार उघड होताच अशा प्रकारांना महापालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. औंध आणि हडपसरमधील घरे भाड्याने दिल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे या घरांत बेकायदा राहणारे रहिवासी नेमके लोकप्रतिनिधी की अधिकाऱ्यांच्या आशीवार्दाने राहात आहेत? यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

औंधमधील इमारतींमधील घरातील रहिवाशांना अधिकाऱ्यांनी ताबा दिल्याचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड यांनी सांगितले. येथील रहिवासी १५ वर्षांपासून याच घरांत राहतात, तेव्हा महापालिका प्रशासनाला कल्पना कशी नाही, असा प्रश्‍नही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे, तर हडपसर भागातील एकाच इमारतीत ५० कुटुंबांनी बेकायदा घरांचा ताबा घेतल्याचे माजी नगरसेवक सुनील बनकर हे पुराव्यानिशी सांगत आहेत.

प्रकल्पांच्या उभारणीतून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या तीन हजारांपैकी दीड हजार घरे काही जणांनी बळकावली असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. पोलिस बंदोबस्तात घरे ताब्यात घेण्याची मोहीम महापालिकेने आखली आहे; परंतु लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवरच आरोप केले आहेत. 

गायकवाड म्हणाले, ‘‘औंध भागांत महापालिकेच्या मिळकती आहेत. तेथील रहिवाशांबाबत तक्रारी केल्या असल्या तरी, ठराविक अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. बेकायदा रहिवाशांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? याची चौकशी झाली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com