चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला; पीएमपीची अवस्था

उमेश शेळके
Friday, 19 February 2021

उच्च वर्गाला आकर्षित करण्यासाठी पीएमपीएमएलने लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी शहरातील पाच ठिकाणाहून वातानुकूलित बस सुरू केली. परंतु त्यातून गेल्या तीन महिन्यात जेमतेम ३९ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पुणे - उच्च वर्गाला आकर्षित करण्यासाठी पीएमपीएमएलने लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी शहरातील पाच ठिकाणाहून वातानुकूलित बस सुरू केली. परंतु त्यातून गेल्या तीन महिन्यात जेमतेम ३९ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, ही बससेवा चालविण्याच्या अट्टहासापायी पीएमपीने ठेकेदाराला ४ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये मोजले. म्हणजेच उत्पन्नाच्या जवळपास १२ पट खर्च या मार्गांवर करत आहे.

पीएमपीएमएलचा कारभार कशा पद्धतीने सुरू आहे, त्याचे हे एक उदाहरण. पीएमपीएमएलला दैनंदिन संचलनात सुमारे पाचशे कोटी रुपयांची तूट येते. ती भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांकडून पीएमपीने पैशांची मागणी केली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कारभारावर नजर टाकल्यानंतर ही सेवा सुधारविण्याची  गरज असल्याचे या उदाहरणावरून समोर आले आहे. या मार्गावरील बसचे उत्पन्न आणि त्यासाठी आलेला खर्च यांची माहिती ‘सकाळ’ने घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेलिकॉप्टरचा पर्याय
मुंबई येथील एका गवळ्याने ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर नुकतेच घेतले. याचा विचार केला तर, पीएमपीने ठेकेदारांवर रक्कम खर्च करण्याऐवजी हे मार्ग बंद करावेत. तेवढ्या रकमेची बचत होऊन पीएमपी स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टर घेऊ शकते आणि त्यातून प्रवाशांना देता येईल.

सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक

प्रत्यक्ष योजना आणि अंमलबजावणी

 • ठेकेदाराकडून प्रतिकिलोमीटर ६३ रुपये दराने पीएमपीने बस घेतल्या.
 • नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पाचही मार्गांवर ४० बसेस सुमारे ७ लाख ५५ हजार किलोमीटर धावल्या.
 • पीएमपीएमपीएल ३९ लाख ४७ हजार एवढे उत्पन्न
 • प्रत्यक्षात ठेकेदाराला ४ कोटी ७५ लाख ६५ हजाराचे बिल अदा. 
 • मिळालेले उत्पन्न आणि ठेकेदाराला दिलेली रक्कम विचारात घेता पीएमपीला ४ कोटी ३६ लाख १८ हजार रुपयांचा तोटा.
 • या बसचे तिकीट कमीत कमी १२० रुपये तर जास्तीत जास्त १८० रुपये.
 • असे असतानाही ही सेवा सुरू ठेवण्यासाठी पीएमपीला एकूण उत्पन्नाच्या जवळपास १२ पट खर्च करावा लागत असल्याचे स्पष्ट. 
 • ही तूट केवळ संचलनातील
 • या व्यक्तिरिक्त साठ वाहकांचे दरमहा वेतन अंदाजे तीस लाख रुपये 
 • या बस चार्जिंगसाठी मासिक वीजबिलाचा आणि तीन महिन्यातील तोटा सुमारे सहा कोटी रुपये.

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

कोठून आहे बससेवा

 • स्वारगेट
 • हडपसर
 • हिंजवडी
 • निगडी
 • कोथरूड 
 • त्यापैकी हिंजवडी ते विमानतळ मार्गावर १६ बस; अन्य चार मार्गावर प्रत्येक सहा बसेस
 • ऑक्टोबरमध्ये पासून बससेवेला प्रारंभ.

अट्टहास का?

 • एवढा तोटा असतानाही बस का सुरू?
 • इतका तोटा होण्याचे कारण काय?
 • प्रतिसाद न मिळण्याचे कारण काय?
 • नियोजनाचा अभाव आहे का?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP Bus Expenditure Increase Income Less