पुणेकरांनो, लॉकडाऊननंतर पीएमपी धावणार, पण 'एवढ्याच' प्रवाशांना मिळणार प्रवेश

मंगेश कोळपकर
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीची वाहतूकही बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर 3 जून रोजी लॉकडाउन उठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर राज्य सरकारचे आदेश आले तर, वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीने तयारी सुरू केली आहे

पुणे : लॉकडाउननंतर वाहतूक सुरू करताना पीएमपीच्या बसच्या क्षमतेच्या निम्मेच प्रवासी घेण्याचा धोरणात्मक निर्णय प्रशासनाने गुरुवारी घेतला. तसेच बसमध्ये प्रवाशांनी कसे बसावे, यासाठी मार्किंगही करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत त्यासाठीचे काम सुमारे 2 हजार बसमध्ये होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या संकटामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीची वाहतूकही बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर 3 जून रोजी लॉकडाउन उठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर राज्य सरकारचे आदेश आले तर, वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसमध्ये आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील किमान सहा महिन्यांसाठी या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. तसेच बसमध्ये सॅनिटायझर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करताना कोणती काळजी घ्यायची, याची माहिती देणारे फलक बसमध्ये लावण्यात येणार आहेत, असेही प्रशासनाने सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अशी असेल आसन व्यवस्था
बसमध्ये एका आड एक, सीटवर प्रवाशांना बसता येईल. त्यासाठी मार्किंग केलेल्या जागांवरच प्रवाशांनी बसायचे आहे. हे मार्किंग करण्याचे काम येत्या आठ- दिवसांत पूर्ण होईल. त्यासाठी मुख्य अभियंत्यांना गुरुवारी आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी एका बसमध्ये चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यामुळे आता सर्वच बससाठी हा नियम लागू करण्यात येत आहे.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

एवढे असतील प्रवासी
12 मीटर लांबीच्या बसमध्ये जास्तीत जास्त 21 प्रवासी तर, 9 मीटर लांबीच्या (मिडी) बसमध्ये 14 प्रवासी बसतील. त्यासाठी आता व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांसाठीच्या जागा आरक्षित असतीलच. प्रवाशांच्या गरजेनुसार बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रवाशाने मास्क परिधान केला नसेल तर, त्याला बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे बंधन प्रवाशांवर असेल.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हक्काचे प्रवासी दुरावले
''पीएमपीच्या बसमधून एरवी 9 ते 11 लाख प्रवाशांची दररोज वाहतूक होत होती. ज्या प्रवाशांकडे स्वतःचे वाहन नाही, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, स्थलांतरित आहे, अशा प्रवाशांची संख्या तुलनेत जास्त होती. कोरोनाच्या संकटामुळे शहरातून सुमारे तीन लाख मजूर परजिल्ह्यात किंवा परप्रांतात गेला आहे. त्यामुळे हक्काचा पीएमपीचा प्रासी दुरावला आहे. एकूण प्रवाशांत त्यांचे प्रमाण सुमारे 30 टक्के होते,'' अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.

पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु

''बसच्या क्षमतेच्या निम्मी प्रवासी संख्या घेवून वाहतूक करायची असल्यामुळे बसच्या फेऱया वाढवाव्या लागतील. गरजेनुसार त्यात वाढ केली जाईल. यासाठीचे नियोजन सुरू आहे.''
- नयना गुंडे (अध्यक्षा- पीएमपी)

खुशखबर! आता पगारात होणार वाढ अन् पीएफमध्ये...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP buses will run with a maximum of 21 passengers