पीएमपी डेपोंमध्ये आता ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोंमध्ये खासगी ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली. तसेच पीएमपीचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजनांनाही संचालक मंडळाने मान्यता दिली.

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोंमध्ये खासगी ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली. तसेच पीएमपीचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजनांनाही संचालक मंडळाने मान्यता दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात ई-वाहनांची संख्या वाढू लागली आहे. परंतु, नजीकच्या काळात चार्जिंग स्टेशन्सची कमतरता भासेल, अशी स्थिती आहे. त्यावर उपाय म्हणून पीएमपी डेपोंच्या आवारातील काही भागात चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. त्यासाठीची गुंतवणूक निवड झालेली खासगी कंपनी करेल. तसेच त्याच कंपनीकडून त्याचे संचलन करण्यात येईल. त्या मोबदल्यात पीएमपीला जागेचे भाडे मिळणार आहे. या चार्जिंग स्टेशन्समधून खासगी दुचाकी आणि चारचाकी ई-वाहनांचे चार्जिंग होईल.

कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर!

डेपोंच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी जाहीर प्रकटन देण्यात येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. संचालक मंडळाने हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. पीएमपीच्या मिळकतींवर सोलर पॅनेल बसवून विजेबाबत स्वयंपूर्णता गाठण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या टप्प्यात संबंधित डेपोंसाठी तर दुसऱ्या टप्प्यात महावितरणला वीज देण्याचा प्रस्तावही मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार

बस थांब्यांचे होणार नामकरण
पीएमपीचे शहरात सुमारे तीन हजार बस थांबे आहेत. त्यातील किमान एक हजार थांब्यांचे नामकरण करणे शक्‍य आहे. त्यासाठी लिलाव पद्धतीने शुल्क आकारणी करण्यात येईल. संबंधित नामकरणाची मुदत पाच वर्षांसाठी असेल.

अशा पद्धतीने वाढणार पीएमपीचे उत्पन्न 

  • पीएमपी डेपोंच्या आवारात किंवा प्रमुख स्थानकांवर होर्डिंग्ज, डिजिटल बोर्डची उभारणी करून ती भाडेतत्त्वावर देणार.
  • विमानतळाच्या धर्तीवर पीएमपीच्या थांब्यांवर पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वाय-फाय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल टॉवर उभारणे, ई- कॉमर्स आदींच्या माध्यमातून उत्पन्नात भर पडू शकेल. 
  • पीएमपीच्या रिकाम्या मिळकतींचे नूतनीकरण करून भाडेतत्त्वावर देणार. 
  • पीएमपीच्या बसमधून कुरिअर, पार्सल सेवा सुरू करणार.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP depots now have charging stations for evehicles