चुकीचे फलक लावून पीएमपी करते प्रवाशांची दिशाभूल

निगडी : पीएमपी बसचा फलक अस्पष्ट असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
निगडी : पीएमपी बसचा फलक अस्पष्ट असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

पिंपरी - पीएमपी मार्गावर विनाफलक (रूट बोर्ड) व चुकीचे फलक लावून बस चालविणाऱ्या पंचवीस कामचुकार वाहक, चालकांकडून प्रत्येकी एक हजारांचा दंड वसूल केला आहे. 

रात्रपाळीत काम करणारे वाहक व चालक बसचा फलक काढून डेपोत टाकून देतात. दुसऱ्या दिवशी कामावर येणाऱ्या चालकाला फलक सापडत नाही. त्यामुळे तो खडूने बसच्या काचेवर मार्गाचे नाव लिहितो. अन्यथा दोन फलकांऐवजी एकावरच काम भागविले जाते. अनेक बस विनाफलक बस धावतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.

बसवर योग्य ठिकाणी फलक दर्शविण्यासाठी नियम व अटी वाहक व चालकांना घालून दिल्या आहेत. यासाठी प्रशिक्षणही दिले आहे. ठेकेदाराकडून फलकांचा पुरवठाही अपुरा होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वाहक व चालकांमध्ये फलक लावण्यासाठी स्वयंशिस्त असणे आवश्‍यक आहे. या संदर्भात आगारातील अधिकारीही जबाबदार आहेत. दिवसातून आठ ते दहा वेळा एक बस वेगवेगळ्या मार्गांवर धावते. अशा वेळी मार्गावरील फलक बदलणे करणे आवश्‍यक आहे. फलकाची तपासणी होणे आवश्‍यक आहे. मात्र, बऱ्याचदा तो बदलला जात नाही. एकच मार्ग वारंवार कर्मचाऱ्यांकडून दर्शविला जात आहे. सकाळी दहा ते बारा व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत फलक तपासणीचे आदेश अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. 

अखेर कारवाईचा बडगा
वाहक व चालकांच्या बेशिस्त वागण्यामुळे पीएमपी अधिकारीही त्रस्त आहेत. त्यामुळे पीएमपीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, भक्ती-शक्‍ती निगडी आगार, डेक्कन, चिंचवड अशा महत्त्वाच्या ठिकाणी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून कारवाई केली आहे. यातून आतापर्यंत २५ हजारांचा दंड वसूल झाला आहे. पीएमपीने यासाठी आगार पर्यवेक्षकाकडे फलकांची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण आगार व्यवस्थापकाचे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com