
अपेक्षित वेतन वाढ दिली नसल्यानं पीएमपीएलच्या निगडी आगारातील इलेक्ट्रिक बसच्या कंत्राटी चालकांनी शुक्रवारी सकाळी काम बंद आंदोलन केलं. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातल्या वादामुळे शेवटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या वादाचा फटका प्रवाशांना बसला. शुक्रवारी पीएमपीएलच्या कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केलं. ८ तासांपेक्षा जास्त काम करूनही ओव्हरटाइम दिला जात नाही. दिवसाला ६५० रुपयेच मिळतात. त्यामुळे वेतन वाढ व्हावी यासह इतर मागण्यांसाठी निगडी आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. जवळपास ८-० कंत्राटी कामगारांनी संप पुकारल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.