प्रवाशांअभावी पीएमपी होणार बंद? चालक-वाहक गेले गावाला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

प्रवासीच नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना प्रवाशांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. काही खासगी वाहन चालकही प्रवासी नसल्याने घरीच थांबणे पसंत करत आहेत.

Coronavirus : भोसरी ः कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी पीएमपीएमएलच्या बसची संख्याही कमी केली आहे. आता रस्त्यावर पीएमपीएमएलच्या फक्त पंचवीस टक्केच बसच्या फेऱ्या सुरू आहेत.  तर भोसरी परिसरातील पीएमपीएमएलने भाडे तत्त्वावर घेतलेल्या सर्व बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. बसच्या फेऱ्या बंद असल्याने भाडेतत्त्वावरील बसचे बसचे वाहक-चालक गावाला गेले आहेत. प्रवासी संख्या घटल्याने पीएमपीएमएलला बस रिकाम्याच न्याव्या लागत आहेत. तर खासगी प्रवासी वाहन चालकांनाही प्रवाशांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी शासनाने नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे.  भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील भाजी मंडईसह सर्वच दुकाने सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात शुकशुकाट आहे. त्याचप्रमाणे प्रवासी संख्याही घटली आहे. बीआरटीएस आणि पीएमपीएमएलच्या बस संख्येमध्येही कपात केली आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या कमतरतेमुळे तुरळक प्रवाशांसह बस मार्गांवर धावत आहेत. 

- कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..

पीएमपीएमएल आणि बीआरटीएसकडे काही बस भाडेतत्त्वावरही बस घेतल्या आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी बीआरटीएस आणि पीएमपीएमएलने बस संख्या कमी केल्याने सर्वच भाडेतत्त्वावरील बस बंद करण्यात आल्याची माहिती अॅंथोनी गॅरेजचे व्यवस्थापक संपत शिळीमकर यांनी दिली. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बस चालक आणि वाहक काम नसल्याने गावाला गेले असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

प्रवासीच नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना प्रवाशांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. काही खासगी वाहन चालकही प्रवासी नसल्याने घरीच थांबणे पसंत करत आहेत. प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती बीआरटीएस टर्मिनलचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे, पीएमपीएमएलच्या राजगुरुनगर बस थांब्याचे नियंत्रक सुरेश कवडे, गव्हाणेवस्तीतील बस थांब्याचे नियंत्रक रामदास लांडगे यांनी दिली.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

बस थांब्याचे नाव १९ मार्चची बस संख्या फेऱ्या २१ मार्चची बस संख्या  फेऱ्या
बीआरटीएस टर्मिनल ६३ १४९  २१   ६३
राजगुरुनगर २६ ८४ ३०
गव्हाणेवस्ती ३४ १५७  ४५

(टीप- गव्हाणेवस्ती बस स्थानकाची २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यंतची संख्या) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML Buses stops due to lack of passengers after corona outbreak