esakal | किरकटवाडी : चोर सोडून पोलिसांची संन्याशाला फाशी
sakal

बोलून बातमी शोधा

police traffick

किरकटवाडी : चोर सोडून पोलिसांची संन्याशाला फाशी

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : दुभत्या किंवा गाभण असलेल्या गायी, म्हशी किंवा शेतीच्या मशागतीसाठी लागणारे बैल अशी जणावरे विकत घेऊन येताना किंवा जाताना किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, खानापूर व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या तथाकथित गोरक्षकांमुळे जणावरांसह शेतकऱ्यांचीही हेळसांड होताना दिसत आहे. दहशतीने वाहने अडवून जबरदस्तीने पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले जात असल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

किरकटवाडी, खडकवासला,डोणजे, खानापूर, पानशेत व सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून या परिसरातील शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय हा या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थार्जनाचे साधन आहे. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतकरी जणावरांची खरेदी किंवा विक्री करतात.

मागील काही वर्षांपासून या भागात गोरक्षकांकडून व त्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाकडून विनाकारण शेतकऱ्यांची वाहने अडवून पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. जनावरे घेऊन चाललेले शेतकरी व वाहन चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच दुभत्या किंवा गाभण असलेल्या गायी, म्हशी बळजबरीने पांजरपोळ संस्थेत नेऊन सोडल्या जात आहेत. याबाबत कारवाई करताना विनाकारण शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा: कामशेत-चिखलसे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी

जनावरांच्या वाहतुकीबाबत हवेली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे.......

2018-1

2019-2

2020-2

2021-1

हेही वाचा: बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनला

"कोणताही शेतकरी दुभत्या किंवा गाभण असलेल्या गायी, म्हशी कधीच खाटकाला विकत नाही. एक ते दीड लाख रुपयांना अशी चांगली गाय किंवा म्हैस विकत घ्यावी लागते. अनेक वेळा अशी जणावरे घेऊन येताना किंवा ज्यांनी विकत घेतली आहेत तिकडे घेऊन जाताना रस्त्यात या विविध संघटनांचे कार्यकर्ते गाड्या अडवतात व दमदाटी करतात. पोलीसांना बोलवून जबरदस्तीने कारवाई करण्यास भाग पाडतात. बाजारसमितीच्या पावत्या दाखवल्या, समोरच्या शेतकऱ्यांशी बोलणे करुन दिले तरी हे लोक ऐकत नाहीत. यामध्ये चारा-पाण्याविना जणावरांचे हाल होतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात दंड भरावा लागतो. खाटीक व्यावसायिकांकडून होणारी जणावरांची वाहतूक छुप्या पद्धतीने सुरू असते, त्यांच्यावर जरुर कारवाई व्हावी परंतु शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये."

-प्रशांत हगवणे, शेतकरी व वाहतूक व्यावसायिक, किरकटवाडी

हेही वाचा: Pune : राज्य सरकारच्या ३०० कोटींकडे महापालिकेचे लक्ष

"जणावरांची वाहतूक करताना काही संघटनांनी वाहने थांबवल्यास आम्ही वाहन, विक्रेता व खरेदी करणारा यांची चौकशी करतो. काही विसंगती आढळल्यास खात्री करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. शेतकऱ्यांना विनाकारण कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी आमच्याकडून घेतली जाते व यापुढेही घेण्यात येईल."

-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

loading image
go to top