बहाद्दर पेट्रोल, डिझेलची चोरी कसे करायचे हे एकदा वाचाच...

मिलिंद संगई
Wednesday, 23 December 2020

पाणी उचलण्याच्या सायपन पध्दतीचा अवलंब करत पेट्रोल-डिझेलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे.

बारामती : पाणी उचलण्याच्या सायपन पध्दतीचा अवलंब करत पेट्रोल-डिझेलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे. यातील तिघांना अटक झाली असून पोलिस या प्रकरणी कसून शोध घेत आहेत. आतापर्यंत या टोळीने साडेतेरालाखांचे जवळपास 18 हजार लिटर डिझेल चोरी केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 
श्रीराम लाला काळे, दशरथ भीमा काळे, नाना गोविंद पवार (सर्व रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

शहीद जवान सुजित किर्दत, नागनाथ लोभे यांना पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक  पद्माकर घनवट यांनी फौजदार  शिवाजी ननवरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, काशीनाथ राजपुरे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, जनार्दन शेळके, राजू मोमिन, धीरज जाधव यांचे पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते.

पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर

सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे  येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. विशेष पथकाला माहिती मिळाली होती की संशयित हे तेरखेडा (ता. वाशी, जिल्हा- उस्मानाबाद) येथील  असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तेरखेडा येथील  फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना 3 जण  दिसून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून एक ट्रक, दोन कॅन, मेटल कटर पान्हा, पाईप, मोबाईल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कुणाल पेट्रोल पंपातून काही दिवसांपूर्वी डिझेल चोरी केल्याचे  उघड झाले होते. येथील पंपाचे मालक पृथ्वीराज जाचक यांच्या सर्तकतेमुळे इंधन चोरीचा प्रकार उघड झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest petrol, diesel thieves in baramati