esakal | खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी

बोलून बातमी शोधा

police
खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी
sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या तसेच शासनाने आखून दिलेल्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर याठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत राज्यांतर्गत अत्यावश्यक कारणाशिवाय फिरण्यास जिल्हाबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून शुक्रवारपासून नाकाबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारण नसताना फिरणाऱ्या तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच खेड-शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदीसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याबाबत राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज नवसारे म्हणाले, "जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर येथील टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. येथून ये-जा करणारे प्रवासी नक्की अत्यावश्यक कामासाठी चालले आहेत का? याची खातरजमा करूनच त्यांना पुढे सोडण्यात येत आहे. तसेच शासनाने प्रवासासाठी वाहनांनुसार प्रवासी संख्येची मर्यादा आखून दिली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे."

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर