Video : बैलाला जेसीबीने मारणारे सापडले; दोघांवर गुन्हा दाखल

टीम ई-सकाळ
Tuesday, 19 November 2019

रस्त्याने ये-जा करत असताना लोकांचा व मोटार सायकलचा पाठलाग करून मारणाऱ्या बैलाला भितीपोटी जीवे मारण्यात आले आहे.

पुणे : जेसीबी मशीनच्या सहाय्याने बैलाला क्रूरपणे जीवे मारणाऱ्या व त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोंधवडी (ता. इंदापूर) येथील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा

का मारले बैलाला ठार?
रस्त्याने ये-जा करत असताना लोकांचा व मोटार सायकलचा पाठलाग करून मारणाऱ्या बैलाला भितीपोटी जीवे मारण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पोंधवडी (ता. इंदापूर) येथे पांढऱ्या रंगाचा बैल हा रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांच्या मागे धावत होता. तसेच मोटार सायकलचाही पाठलाग करत होता. बैलाने चार मोटार सायकलींची तोडफोड केली होती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गेटही तोडले होते. त्यानंतर बैल गावातील लोकांना मारून जिवीतहानी करेल या भितीने गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे (रा. पोंधवडी, ता. इंदापूर) यांने जेसीबी मशीनच्या बकेटने बैलाला क्रुरतेने जखमी करून ठार मारले. त्यास जेसीबी मशीनच्या बकेटमध्ये भरुन महादेव मंदिराच्या जवळ पुरले होते. या घटनेचा भाऊसाहेब अप्पा खारतोडे (रा. पोंधवडी) याने व्हिडीओ करून तो व्हायरल केला होता. याप्रकरणी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे व भाऊसाहेब अप्पा खारतोडे यांचेविरुध्द भारतीय दंड विधान नुसार प्राण्यांशी क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

आणखी बातम्या वाचा

ताज्या बातम्या

मुख्य बातम्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police booked charges against two persons who killed bull by jcb