पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' "तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी पोलिस ठाण्यांना भेटी देत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

पुणे - "तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' "तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी पोलिस ठाण्यांना भेटी देत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर "तुमच्यापैकी किती जणांना कोरोना संसर्ग झाला, सगळे बरे आहेत ना,' असे कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी उच्चारलेल्या दोन शब्दांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी सुखावले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सोमवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत गुन्ह्यांची सद्यःस्थिती, कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती घेतली होती. तर मंगळवारी मात्र त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देण्यास पसंती दिली. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता ते फरासखाना पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्या फरासखाना पोलिस ठाण्यावरील कार्यालयास भेट दिली. त्यानंतर त्यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याशी गुन्ह्यांच्या पद्धतीविषयी चर्चा केली. त्यानंतर गुप्ता यांनी फरासखाना, विश्रामबाग, खडक व समर्थ पोलिस ठाण्याला भेट दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुप्ता यांनी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना काळजी घेण्यास सांगून पोलिस ठाण्यांमधील सोयीसुविधा व पोलिसांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. 

शिक्षकांना न्याय मिळवून द्या; वाचा, कोणी केली मागणी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Commissioner Amitabh Gupta interacted with the police