'पुण्यातील सेवेचा प्रवास कायम आठवणीत राहील'; डॉ. वेंकटेशम यांचा भावनिक संदेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पुणेकरांनी आपल्याला खुल्या दिलाने स्वीकारले, त्याचबरोबर गुन्हेगारी नियंत्रण, अपघात कमी करणे आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या विविध उपाययोजनांना प्रतिसाद दिला.

पुणे : पुण्याने आणि पुणेकरांनी मला तीन वर्षांच्या सेवेमध्ये खूप काही शिकण्याची संधी दिली. चांगल्या कामासाठी, गरजूंच्या मदतीसाठी कायम प्रोत्साहन दिले आणि माझ्या मराठी भाषेच्या ज्ञानात भर घालण्याचे मौल्यवान काम केले. पुण्यातील सेवेचा प्रवास कायम आठवणीत राहील, अशा शब्दात पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

फक्त दहा सेकंदात होणार कोरोनाचं निदान; मराठमोळ्या शास्त्रज्ञानं विकसित केलं यंत्र!

राज्य सरकारच्या गृहविभागातर्फे गुरुवारी (ता.१७) राज्यातील प्रमुख शहरे आणि जिल्ह्यांचे पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांची नक्षलवादविरोधी विशेष अभियानात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती केली. तर गृहमंत्रालयातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर डॉ. वेंकटेशम यांनी पुणेकरांना मेसेज पाठवून त्यांचे आभार मानले. 

अबुधाबीतील कंपनीच्या प्रस्तावाला डीएसकेंचा हिरवा कंदील; सुचवले तीन पर्याय​

पुणेकरांनी आपल्याला खुल्या दिलाने स्वीकारले, त्याचबरोबर गुन्हेगारी नियंत्रण, अपघात कमी करणे आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या विविध उपाययोजनांना प्रतिसाद दिला. मी आशावादी असल्याने शहरासाठी चांगले काम करायचे मनात पक्के केले होते, ते केले. विशेषतः कोरोनाच्या संकटात पुणे पोलिस लोकांच्या मदतीला धावून गेले, पोलिस कर्मचारी देखील सहजवृत्तीने लोकांना मदत करत होते, ही भावना निर्माण झाली हे महत्त्वाचे आहे. पुणेकरांबरोबरच पोलिस अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यमे यांनीही चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी नमूद केले. 

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

डॉ. वेंकटेशम म्हणाले, "पुणेकरांकडून मला निर्व्याज आणि निखळ प्रेम मिळाले. पुण्यातील हा प्रवास कायम आठवणीत राहील. पुणेकरांनी माझ्या मराठी भाषेच्या ज्ञानात खूप भर घातली. त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. पोलिस आयुक्तपदाच्या सेवाकाळात पोलीस उपायुक्तांपासून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वचनबद्धतेने आणि सांघीक भावनेने काम केले. त्यामुळेच पुणे शहर सुरक्षित ठेवण्यात आम्हाला यश आले, हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच घडू शकले.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Commissioner Dr K Venkatesh expressed his gratitude to citizens of Pune