रोडरोमिओला पोलिसांचा हिसका

road romeo
road romeo

पुणे - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत छेड काढणाऱ्या रोडरोमिओला पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात हा प्रकार घडला.

आकाश विजयकुमार पाटकर (वय १९, रा. वडकी नाला, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित मुलीच्या आईने एक मुलगा माझ्या मुलीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हडपसर पोलिसांनी मुलाचे नाव, पत्ता माहिती नसतानाही त्या रोडरोमिओचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा वडकी नाला येथे राहावयास आहे. संबंधित मुलगी रस्त्यावरून जाताना दिसली, की तो तिचा पाठलाग करायचा. तसेच, बळजबरीने तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचा हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू होता. मुलीशी आकाशची ओळख नव्हती तसेच त्याचे नाव आणि पत्ताही माहीत नव्हता. दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. मुलीच्या आईने हडपसर पोलिसात धाव घेत त्रास देणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच तपास सुरू केला. 

सहायक निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी युसूफ पठाण, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख, शशिकांत नाळे, ज्ञानेश्वर चित्ते आदींच्या पथकाने मुलगी राहत असलेल्या भागात सापळा रचून आरोपीस अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com