esakal | बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...
sakal

बोलून बातमी शोधा

Photographer

या प्रकरणी अनिस महम्मद हनिफ पटेल (वय २४, रा. निमगावसावा, ता. जुन्नर) याला अटक केली आहे. आरोपी पटेल याचा निमगावसावा येथे फोटो स्टुडिओ आहे.

बनावट प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करायचा फोटोग्राफर; मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : संगणकीय प्रणालीचा वापर करून बनावट आंतरजिल्हा प्रवासी पास तयार करून त्याची विक्री करणाऱ्या फोटोग्राफरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लॉकडाऊन कालावधीत तो या पासची विक्री करत शासनाची तसेच ग्राहकांची फसवणूक करत होता.

- उपमुख्यमंत्र्यांनी जळगाव सुपेला दिली भेट अन्...

याबाबतची माहिती मिळताच निमगावसावा येथील फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून लॅपटॉप, मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर आदी ४५ हजार ६०० रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटिल यांनी दिली.

- परिस्थितीशी दोन हात करत पुण्यातील मोनिका बनली उपशिक्षण अधिकारी

या प्रकरणी अनिस महम्मद हनिफ पटेल (वय २४, रा. निमगावसावा, ता. जुन्नर) याला अटक केली आहे. आरोपी पटेल याचा निमगावसावा येथे फोटो स्टुडिओ आहे. फोटो स्टुडिओमधील साहित्याचा गैरवापर करून पटेल शासकीय व पोलीस दलाचे चिन्हांचा बेकायदेशीर वापर करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळात त्याने अनेक बनावट आंतरजिल्हा प्रवासी पास तयार करून त्याची वाहनचालकांना विक्री करत होता.

- महावितरण कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रूपये

नारायणगाव पोलिसांनी शनिवारी (ता. २०) दुपारी छापा टाकून आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून बनावट पास तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आरोपीला जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top