गमावलेलं नाव पुन्हा कमावलं; पोलिसांच्या समोरून पसार झालेल्यांपैकी एकाला अटक

Crime_Arrest
Crime_Arrest

पुणे : औंध परिसरात घरफोडी करून पोलिसांसमोरूनच पसार झालेल्या चारपैकी एक असलेल्या मुख्य गुन्हेगाराला पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. रामटेकडी येथील जंगलात पाठलाग करीत हडपसर आणि चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. चोरट्याकडे ब्लेड आणि धारदार शस्त्र असतानाही जिवाची पर्वा न करता पोलिसांनी त्याला अटक केली.

बिरजूसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्यावर घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. औंध परिसरात सिद्धार्थनगर भागात शैलेश टॉवर सोसायटी येथे 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास चार चोरटे घरफोडी चोरी करण्यास शिरले होते. चोरटे घरफोडी करत असल्याची कुणकूण लागल्याने सोसायटीतील कोणीतरी ही बाब पोलिस नियंत्रण कक्षास फोनद्वारे कळवली. त्यानंतर थोड्या वेळात दोन पोलिस त्या ठिकाणी दुचाकीवर आले, परंतु पोलिसांनी स्वतः:कडे बंदूक असतानाही चोरटे त्यांच्या समोरून पळून गेले होते.

असा काढला बिरजूसिंग माग :
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना ते हडपसर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हडपसर व चतुश्रृंगी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींचा रामटेकडी येथील जंगलात शोध घेतला. तेव्हा दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना बिरजूसिंग दिसला. दोघेही पोलिस त्याच्या दिशेने जात असतानाच त्याने हातात ब्लेड आणि धारदार हत्यार दाखवत पोलिसांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघाही पोलिसांनी धाडस दाखवत पाठलाग करून त्याला पकडले.

पोलिसांना दाखवला खंजीर :
चोरांना पाहून पळून गेलेल्या पोलिस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलिस नाईक अनिल दत्तू अवघडे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पळून जाताना त्यांना बिरजूसिंग याने खंजीरचा धाक दाखवला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांची मोठी बदनामी झाली होती. चोरट्यांना पाहून पोलिसच पळ काढत असतील तर सर्वसामान्यांचे सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे पुणे पोलिसांची मोठी बेईज्जती झाली होती. मात्र दोघा पोलिसांनी पुणे पोलिसांचे गमावलेले नाव पुन्हा मिळवून दिले आहे.

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com