पिंपरीत पोलिस निरिक्षकाच्या मुलाची आत्महत्या 

सकाळी वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

​बुधवारी रात्री अभिषेकने आतून दरवाजा बंद करून घेतला होता. गुरूवारी सकाळी उशीरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने अभिषेकची आई व पत्नीने आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

पिंपरी : पिंपरीतील मोरवाडी येथे पोलिस निरिक्षकाच्या मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता.26) उघडकीस आली. अभिषेक अजित दळवी (वय 29) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार
 

अभिषेक हा आई व पत्नीसह मोरवाडी येथे राहत होता. तर वडील अजित दळवी हे सांगली येथे पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. एक वर्षापुर्वीच अभिषेकचे लग्न झाले आहे.

महत्त्वाचे! मुंबई-पुणे प्रवास करत असाल तर ही बातमी वाचलीच पाहिजे

बुधवारी रात्री अभिषेकने आतून दरवाजा बंद करून घेतला होता. गुरूवारी सकाळी उशीरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने अभिषेकची आई व पत्नीने आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाला कळवून दरवाजा उघडला असता अभिषेक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Video : अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना दिसलं सूर्यग्रहण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police inspector boy commits suicide in Pimpri