रक्षकच बनला भक्षक; गुंगीचे औषध पाजून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

माने हा पुण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्याची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती.

पुणे : पोलिस निरीक्षकाने महिलेला त्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षकाविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झाली लेक; आईनं सुरू केलं आमरण उपोषण!​

चंद्रकांत भगवानराव माने असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक माने याची सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हा पुण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्याची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती. माने याने महिलेला भवानी पेठेतील पोलीस वसाहतीतील घर दाखविण्यास नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

IPL 2020 : 'राहुल, नाम तो सुना ही होगा'; यंदाच्या आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक​

या घटनेचे मानेने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याबरोबरच छायाचित्रेही काढली. चित्रीकरण, छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन माने त्याने पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. या धमक्‍यांना घाबरून महिलेने अखेर समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा तपास समर्थ पोलिसांकडून केला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police inspector raped woman by giving her a sedative