शिक्रापूर क्रश-सँड प्रकरणात पोलिस नाईक हेमंत इनामे निलंबित

valu.jpg
valu.jpg

शिक्रापूर : पोलिसांचा या प्रकरणाशी संबंधच नसल्याचे सांगणार्या जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने अखेर शिक्रापूर क्रश-सॅंड प्रकरणी हेमंत पांडूरंग इनामे यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. 'सकाळ'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांनी या प्रकरणाची गोपनीय चौकशी आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्फत करुन वरील निर्णय नुकताच घेतला.

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा वाळूवाहतूक करताना २२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या ट्रकला (एमएच १४ एचजी ७२९१) महसूल विभागाच्या कारवाईसाठी पोलिस स्टेशन आवारात उभे केले होते. या ट्रकमधील वाळू लपविण्यासाठी त्यात क्रशसॅंड टाकण्याचा गंभीर प्रकार भर पोलिस स्टेशनमध्ये घडला आणि हे संपूर्ण प्रकरण महसूल विभागाचे असल्याचे सांगून त्यांच्यावरच सोपवून शिक्रापूर पोलिसांनी यातून काही कर्मचा-यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र सकाळने हे प्रकरण सातत्याने लावून धरल्यावर डॉ.संदीप पाटील यांनी स्वत:हून उपविभागिय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांचेकडे या प्रकरणाची गोपनीय चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचे रिपोर्टप्रमाणे आपण कारवाई करणार असल्याचे त्यांनी मागील आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी वाळूबीट पाहणारा शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक हेमंत पांडूरंग इनामे (बक्कल नं.२१८८) याचेवर तात्काळ निलंबनाची तसेच खात्यांतर्गत त्याची चौकशी करण्याची कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे वतीने जाहिर करण्यात आली. 

शिक्रापूर पोलिस कर्मचा-यांकडून सकाळचे अभिनंदन...!
एकामुळे आमचे संपूर्ण पोलिस स्टेशन बदनाम होत होते. ज्याने केले त्याने भरावे. या अर्थी इनामे याचेवर झालेली कारवाईचे आम्ही स्वागत करतो. इनामे याचेबाबतीत आमच्या सर्वांकडेच खुप तक्रारी होत्या. मात्र कुणाला आणि कशा सांगाव्यात हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून आम्हाला पडला होता. एकच दु:ख असे की, सदर कारवाई खुपच उशिरा झालीय. असे अनेक पोलिस अधिकारी-कर्मचा-यांनी सकाळ प्रतिनिधीला संपर्क साधून नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com