कॅफेत लावली होती अश्लिल छायाचित्रे अन् ठेवला होता मंद उजेड

Police raid on cafe where pornographic photographs were kept in baramati.jpg
Police raid on cafe where pornographic photographs were kept in baramati.jpg

बारामती : विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी येथील हिडन कॉफी शॉपवर छापा टाकून चालक राकेश ऊर्फ बिट्या गणेश गायकवाड, मालक तानाजी बाबूराव चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

शहरातील टीसी महाविद्यालयासमोर तळमजल्यावर हे कॉफी शॉप सुरू होते. या कॉफी शॉपमध्ये अश्‍लील पोस्टर चिटकविले असून अश्‍लील गाणी लावली जातात. जाणीवपूर्वक मंद उजेड ठेवला जातो, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिस कर्मचारी विजय वाघमोडे यांनी फिर्याद दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन

दरम्यान, हिडन कॉफी शॉपसंदर्भात विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्या होत्या, त्या अनुषंगाने ही कारवाई केली. बारामती नगरपालिकेलाही याबाबत पत्र देण्यात आले असून हा गाळा सील केल्याचेही पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.
 भन्नाटच! अशी लग्नपत्रिका पाहिलीच पाहिजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com