esakal | दौंड शहरातील बेकायदेशीर ऑनलाईन जुगार अड्डय़ावर पोलिसांची कारवाई

बोलून बातमी शोधा

police
दौंड शहरातील बेकायदेशीर ऑनलाईन जुगार अड्डय़ावर पोलिसांची कारवाई
sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड शहरातील (daund) गोपाळवाडी रोड सरपंचवस्ती परिसरात चालू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन जुगार अड्डय़ावर (illegal online gambling) सोमवारी (ता. 3) पोलिस (police) उपअधीक्षक मयुर भुजबळ यांच्या पथकाने छापा टाकून ऑनलाईन जुगारीसाठी लागणारी साधने व रोख रक्कम असा एकूण 76 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरूध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल (crime) करण्यात आला आहे.(police raid illegal online gambling den at daund).

दौंड शहरातील गोपाळवाडी रोड सरपंचवस्ती परिसरातील अर्जुन रमेश शिंदे यांच्या मालकीच्या गाळयात कोरोना लाॅकडाऊन काळातही बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मयुर भुजबळ यांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षकांच्या पथकाने सदर ऑनलाईन जुगार अड्डय़ावर छापा टाकला. सदर गाळयामध्ये आरोपी आदर्श अनिल जाधव ( वय 23, रा. गोवा गल्ली दौंड, ता. दौंड) व स्वप्नील श्रीकांत रणदिवे (वय 29, मिरा सोसायटी दौंड) हे ऑनलाईन फन टारगेट टायमर (गेम ऑफ स्कील नसून गेम ऑफ चान्स) नावाचा जुगार लोकांना जमवून चालवित असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 अंतर्गत आदर्श जाधव व स्वप्नील रणदिवे यांच्याविरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ऑनलाईन जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण 76 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात पोलिस शिपाई किशोर हनुमंत वाघ यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एस लोंढे करीत आहेत. शहरात आणखी काही ठिकाणी बेकायदेशीर ऑनलाईन जुगार चालू आहे. हा जुगार खेळल्याने अनेक तरूण कर्जबाजारी झाली असून कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दौंड शहरातील सर्व ऑनलाईन जुगारावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात