esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी पोलिस दल सज्ज : डॉ. अभिनव देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी पोलिस दल सज्ज : डॉ. अभिनव देशमुख

कोरोनाच्या येणा-या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी पोलिस दल सज्ज : डॉ. अभिनव देशमुख

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) : कोरोनाच्या येणा-या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. कोल्हापूर पोलिस परिमंडलाचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्यासोबत डॉ. अभिनव देशमुख यांनी येथील पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

जिल्ह्यातील अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यापैकी ८०० जणांनी कोविडची लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर सुमारे २४ तास काहींना थकवा जाणवत असल्यामुळे आणि पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी नियमीत नसल्यामुळे अनेक पोलिसांना लस घेता आलेली नाही. परंतु अगामी काळात सर्व पोलिसांचे लसीकरण केले जाणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी चोवीस तास ड्युटी केलेली आहे. नागरिक माणुसकी विसरून आपल्या नातेवाईंकांचे मृतदेह घेवून जात नव्हते, तेंव्हा आमच्या पोलिसांनी तेही काम पूर्ण केले होते. मात्र यावेळी लस उपलब्ध आहे आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाबत जागृती झालेली आहे. त्यामुळे यावेळी पोलिस आत्मविश्वासाने काम करतील. 

*भोरला पोलिस कर्मचारी देणार  
जिल्हात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या ३०० ने कमी आहे. भोर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची संख्या फारसी नसल्यामुळे भोर पोलिस ठाण्यात कर्मचा-यांची संख्या कमी आहे. परंतु यापुढे भोरला आवश्यक असलेल्या १० पोलिस कर्मचा-यांपैकी काही पोलिसांची नियुक्ती केली जाईल. असेही डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

*कर्तव्यात कसूर केलेले चार कर्मचारी निलंबीत
भोर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून मोक्का अंतर्गत असलेल्या दोन आरोपींनी पलायन केले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार समीर शेख, निखील खंदारे, अक्षय वायदंडे आणि कुणाल म्हस्के या चार जणांना निलंबीत केले असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)