पोलिस भरती प्रकरण : परीक्षार्थींना उत्तर सांगणाऱ्या पोलिस अंमलदारास अटक

गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.
Police Recruitment  Exam Fraud
Police Recruitment Exam FraudSakal

पुणे : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान (Police Recruitment Written Exam) मास्कमध्ये इलेक्ट्रीक यंत्र बसवून पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर पोलिस दलातील (Aurangabad City Police Force) पोलिस अंमलदारांसह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा पद्धतीने तीन लेखी परीक्षेदरम्यान उत्तरे सांगितली असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

राहुल उत्तम गायकवाड (वय ३३, रा. मिल कॉर्नर पोलिस हेड कॉर्टर, औरंगाबाद) असे या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्याच्यासह गणेश रामभाऊ वैद्य (वय २५, रा. धोंदलगाव, वैजापूर, औरंगाबाद) याला देखील अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी नितीन जगन्नाथ मिसाळ (वय २६) आणि रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय २४, दोघेही रा. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक शशिकांत यशवंत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंजवडी परिसरातील ब्ल्युरीज पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान मास्कमध्ये इलेक्ट्रीक यंत्र बसवून परीक्षा देण्याचा प्रयत्न करत असताना मिसाळ आणि शिंदे यांना पकडण्यात आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.

Police Recruitment  Exam Fraud
कोल्हापूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला डावलून भाजपसोबत

गायकवाड आणि वैद्य यांना मंगळवारी (ता. २१) न्यायालयात हजर करण्यात आले होते. गायकवाड याला कायद्याचे ज्ञान असताना देखील त्याने हा गुन्हा केला आहे. तो याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना देण्याची शक्यता कमी आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रीक यंत्र कुठून आणले याचा तपास करायचा आहे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणारे रॅकेट कार्यरत आहे का? याचा छडा लावण्यासाठी आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरासरी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गायकवाडच्या सासऱ्यांची ॲकॅडमी :

गायकवाड याच्या सासऱ्यांची पोलिस भरतीची ॲकॅडमी आहे. त्या ॲकॅडमीमध्ये अशा पद्धतीने परिक्षा देण्याचे रॅकेट सुरू आहे का ? तसेच त्याने नेमकी कोणाला उत्तरे सांगितली याचा पोलिस तपास करीत आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com