आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण : विद्यार्थ्यांना पेपर देणाऱ्याला अटक

संजय शाहूराव सानप (वय ४०, रा. पाटोदा, बीड) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे.
पेपरफुटी प्रकरण
पेपरफुटी प्रकरणSakal

पुणे : आरोग्य भरती (Health Department Recruitment) परीक्षेत गट ड आणि क पदाचा पेपर परिक्षेपुर्वी अनेक विद्यार्थ्यांना (Student) पाठविणाऱ्यास सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे. संजय शाहूराव सानप (वय ४०, रा. पाटोदा, बीड) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या तीन क्लासचालकाच्या मोबाईलमध्ये म्हाडाच्या प्रत्येक पदासाठी किती पैसे घ्यायचे याचे रेट कार्ड सापडले होते. भरतीचा रेट एका कागदावर लिहिण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे. अजय नंदू चव्हाण (३२), अंकित संतोष चनखोरे (२३) आणि कृष्णा शिवाजी जाधव (३३) असे या क्लासचालकांची नावे आहेत.

पेपरफुटी प्रकरण
हिंगोली : नर्सी रोडवरील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु

त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासानंतर सानप याच्यासह एकूण १८ आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सानप याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याने किती परीक्षार्थींना पेपर देवून त्यांच्याकडून किती पैसे घेतले? त्याने कोणाकडून हा पेपर मिळवला? तसेच आरोपीच्या घराची झडती घेऊन त्यात मिळणाऱ्या पुराव्याचा आधारे आरोपीकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांना केला. न्यायालयाने सानप याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com