पुणेकरांनो,तुमच्या समस्या सोडविणार पुणे पोलिस; कसे वाचा सविस्तर

Police survey to understand the problems of Pune residents and solve them.jpg
Police survey to understand the problems of Pune residents and solve them.jpg

पुणे : शहरातील नागरिक कोणत्या कारणांसाठी बाहेर पडत आहेत? त्यांच्या समस्या समजून घेत त्या नेमक्या कशा सोडवता येतील याचा आराखडा तयार करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाइन सर्वे केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन काळात विविध वस्तू आणण्यासाठी किंवा इतर कामांसाठी नागरिक घराबाहेर पडत असून त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी घरातच थांबा असे,  आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत ज्यासाठी ते जास्त वेळा बाहेर पडत आहे. ही गरज व त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी हा सर्वे घेण्यात येत आहे. सर्वेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांनी द्यावीत, असे आवाहन सोशल माध्यमांवर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...
 
नाव, वय व कुटुंबात व्यक्ती किती आहेत? घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत का? काय आणण्यासाठी व किती वेळा आपण घरातून बाहेर पडता? लॉकडाउन काळात आपल्याला कोणत्या अडचणी येत असून कोरोनामुळे आपली मनस्थिती कशी आहे? तसेच आपण शहराच्या कुठल्या भागात राहता ? असे प्रश्न सर्वेत विचारण्यात आले आहेत.

मंगळवारपासून ( ता. 19) हा सर्वे सुरू करण्यात आला असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमित मास्क व सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे ही आता आपली आता जीवनशैली होणार आहे. या तीनही गोष्टी आपल्या दैनंदिन स्वभावात येणे गरजेचे आहे. त्यासाठी काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी हा सर्वे मदत करणार आहे. या सर्वासाठी एक टीम नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यामार्फत हा सर्वे केला जात आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. 

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

''या परिस्थितीत नागरिकांच्या नेमक्या काय भावना आहेत? त्यांच्या काही सूचना किंवा उपाययोजना आहेत का? हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सोशल माध्यमांवर हा सर्वे घेण्यात येत आहे.तीन दिवसानंतर सर्वेचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत.''
- डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त. 


पुणेकरांनो, सर्वेत सहभागी होण्यासाठी क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com