esakal | पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Police were beaten by gang war in pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील सन्मित्र अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भांडणे सुरू होती. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन गटात सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात वर्दीची कॉलर पकडून पोलिसास मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्दीची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना बिबवेवडी येथे रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. 

लघुशंकेसाठी थांबले अन् 5 जणांसाठी टेम्पो ठरला कर्दनकाळ

सुनिल चावदास बोरूले (वय 51), रोहन सुनील बोरूले (वय 20 ), शुभम अरुण पवार (वय 23 ), अमित रामकृष्ण पवार (वय 28) व सुमित रामकृष्ण पवार (वय 29, सर्व रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विश्‍वनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन संशयित आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील सन्मित्र अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भांडणे सुरू होती. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी शिंदे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन गटात सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहन बोरुले याने फिर्यादीच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश ऊसगावकर करीत आहेत. 
अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

loading image
go to top