Ajit Pawar : बारामतीत पोलिस राबविणार शक्तीअभियान

बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास प्राधान्य दिलेले असून या बाबत पोलिस विभागाकडून शक्ती अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

बारामती - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास प्राधान्य दिलेले असून या बाबत पोलिस विभागाकडून शक्ती अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गेल्या काही दिवसात बारामतीत घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 3) बैठक घेत सविस्तर चर्चा केली.

त्या नंतर पत्रकार परिषदेत शक्ती अभियानाविषयी अजित पवार यांनी माहिती दिली. बारामतीतील घडलेले प्रकार मी स्वताः गांभीर्याने घेतलेले असून या बाबत पोलिसांनी योग्य त्या सूचना केलेल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

काय आहे शक्ती अभियान.....

  • महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन यावर आधारीत हे अभियान राबविले जाणार आहे. यात शक्तीबॉक्स (तक्रारपेटी) विविध ठिकाणी ठेवली जाईल. त्यात महिला व मुली आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात टाकू शकतील.

  • परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एस.टी.स्टँड, कोचिंग क्लासेस, टयूशन, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलीसांमार्फत 'शक्तीबॉक्स' (तक्रारपेटी) ठेवली जाईल.

  • शक्तीनंबर-एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह- 9209394917 या क्रमांकांची सेवा ही सात दिवस चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारींचे त्वरीत निराकरण करणेबाबत व त्यावर योग्य योग्य ती कारवाई करणेबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. संबंधीतांचे नाव गोपनीय असेल.

  • शक्तीकक्ष :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलिस ठाण्यात 'शक्तीकक्ष' स्थापन करण्यात येणार आहे. त्यात दोन महिला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात येणार आहे. यात महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देवुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचे अडचणींचे निराकरण करणे तसेच समुपदेशन होईल.

  • शक्तीनजर :- सोशल मिडीया त्यामध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम याावर अल्पवयीन/किशोरवयीन मुले / मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदुक, पिस्तुल, चाकु अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबतचे फोटो/पोस्ट टाकतात. त्यावर सदर पथकाची नजर असणार असुन असे प्रकार आढळुन आल्यास तात्काळ कडक कारवाई केली जाणार आहे.

  • शक्तीभेटः- शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एस.टी.स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतिगृह येथे भेटी देत महिलांचे प्रबोधन करत त्यांचे लैगींक, शाररीक तसेच मानसिक छळापासुन संरक्षण होईल अशा उपाययोजना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com