Pune Gram Panchayat Election; जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

Polling for 649 gram panchayats in Pune district today
Polling for 649 gram panchayats in Pune district today

शेटफळगढे (पुणे) : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च 20 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर 27 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.  

2 नोव्हेंबर 20 ला प्रभाग रचना व आरक्षणे यास जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता दिली होती.  त्यानंतर 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत प्रभाग निहाय मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पूर्ण करण्यात आली. त्यानंतर 11 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेल्या 748 ग्रामपंचायतींपैकी देहू नगरपंचायत झाल्याने तेथील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आला. त्यानंतर  मंगरूळ ग्रामपंचायतीची ही निवडणूक प्रक्रिया विभाजनामुळे थांबविण्यात आली. त्यामुळे 746 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला  उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी अर्थात  23 डिसेंबरला  सुरुवात झाली होती. यापैकी  84 ग्रामपंचायती या पूर्णपणे बिनविरोध झाल्या.  तर 2 हजार 80 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. 

जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये  काही जागा बिनविरोध झाल्याने  व उर्वरित जागा रिक्त राहिल्याने याही 12 ग्रामपंचायती  अंशतः  बिनविरोध झाल्या होत्या.  तर पिंगोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने  तेथील निवडणूक प्रक्रिया  थांबली. यामुळे 649 ग्रामपंचायतींसाठी  15 जानेवारीला सकाळी साडेसात ते  साडेपाच या वेळेत  मतदान होणार आहे. हा काळ चार जानेवारीपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा  प्रचार करीत असलेल्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्यासाठी  अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक दृष्टिक्षेप
(1)राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेल्या जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या -748 (2)निवडणूक स्थगित झालेल्या ग्रामपंचायती संख्या-2 
 (3) निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या गावांची संख्या- 1
 (4) बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या-84 
(5) अंशतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या -12
(6) जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या-649
(7) निवडणूक लागलेल्या प्रभागांची संख्या-2 हजार 10
(8) निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांची संख्या- 5 हजार 33
(9) निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची संख्या 11 हजार 7
(10) जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 439
(11) निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार 417
(12) ग्रामपंचायतींसाठी बजावणाऱ्या एकूण मतदारांची संख्या 14 लाख 58 हजार 367
( पुरुष 7 लाख 53 हजार 224, महिला 7 लाख 5 हजार 125, इतर 18) 
 

निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींची तालुकानिहाय  संख्या पुढीलप्रमाणे - भोर 63,.वेल्हे 20,.पुरंदर 55, इंदापूर 57, बारामती 49, मावळ 49 ,जुन्नर 59, आंबेगाव 25, हवेली 45, दौंड 49 ,मुळशी 36, खेड 80 ,शिरूर 62

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com