esakal | पुणेकरांना आता मिळतेय शुद्ध हवा; पाहा किती प्रमाणात घटले प्रदुषण
sakal

बोलून बातमी शोधा

air.jpg

लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे "अर्बन एमिशन'च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील लॉकडाउन 1 ते 4 दरम्यान हवेतील प्रदुषक घटकांची पातळीची नोंद घेण्यात आली आहे.

पुणेकरांना आता मिळतेय शुद्ध हवा; पाहा किती प्रमाणात घटले प्रदुषण

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणात निम्म्याने घट झाल्याचे "अर्बन एमिशन'च्या अहवालातून सिद्ध झाले आहे. राज्यासह देशभरातील प्रमुख शहरांतील लॉकडाउन 1 ते 4 दरम्यान हवेतील प्रदुषक घटकांची पातळीची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नाशिक शहरातील प्रदूषण जवळजवळ निम्म्याने घटल्याचे दिसत आहे. 

पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती

प्रदूषणाचे घटलेले हे प्रमाण लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर निश्‍चित वाढेल. अल्पकाळासाठी असलेली ही शुद्धहवा पुढील काळातही कायम राहावी म्हणून देशभरात विविध उपाययोजनांचे आयोजन करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "स्वच्छ हवा सर्वांसाठी' ही मोहीम राबविण्यात आली आहे. 

स्वच्छ हवेसाठी वर्षभर-60 मोहीम ः 
लॉकडाउननंतरही प्रदुषणातील ही घट कायम राहावी यासाठी पर्यावरण कार्यकर्त्यांच्या वतीने वर्षभर-60 या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरांमध्ये हवेतील पीएम.2.5 आकाराच्या प्रदुषकांची पातळी 60 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर एवढी राखली जावी, असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. यासाठी शहरांमध्ये योग्य त्या उपाययोजना आखण्यात आल्या की नाही, याची खातरजमा सरकारने करावी अशी मागणी या मोहिमे अंतर्गत करण्यात आली आहे. मोहिमेसाठी #SaalBhar60 या डिजिटल मोहिमेचे आयोजनही पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले होते. राज्यातील पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून ट्विट करत ऑनलाइन मोहीम छेडली आहे. वातावरण फाउंडेशन, लंग केअर फाउंडेशन आदी पर्यावरणवादी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोना साथीने दाखवून दिले की आपल्याकडेही शुद्ध हवा आहे. प्रदूषित हवा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करते. विविध शहरांमधील प्रदूषित हवेचे वाढते प्रमाण आपल्या मुलांसाठी घातक असून, सर्वांनीच आता स्वच्छ हवेसाठी आग्रही असले पाहिजे. - डॉ.अरविंद कुमार, विश्वस्त, लंग केअर फाउंडेशन 

पुणे शहरातील चारही लॉकडाउनमधील विविध प्रदुषक घटकांचे प्रमाण (एकक ः मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये) 
प्रदुषकाचे नाव ः लॉकडाउनपुर्वी 30 दिवस लॉकडाउन-1 ः लॉकडाउन-2 ः लॉकडाउन-3लॉकडाउन-4 
1) पीएम 2.5 ः 54.8 ः 23.2 ः 21.3 ः 21.2 ः 21.4 
2) सल्फर डायऑक्‍साईड ः 48.4 ः 24.5 ः 22.6 ः 22.5 ः 23.7 
3) नायट्रोजन डायऑक्‍साईड ः 17.4 ः 8.8 ः 8.1 ः 8.1 ः 8.5 
4) पीएम 10 ः 91.4 ः 37.2 ः 34.1 ः 33.9 ः 35.8 
5) कार्बन मोनाऑक्‍साईड ः 1692.9 ः 1088.9 ः 1013.8 ः 1023.5 ः 1117 
6) ओझोन ः 44.9 ः 21.6 ः 20.8 ः 21.9 ः 22.9 

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...