Video: संजय राठोडांचा राजीनामा घेतला, मग गुन्हा का दाखल केला नाही? पूजाच्या आजीचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलिस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत.

घोरपडी (पुणे) : वनमंत्री संजय राठोड यांचा सरकारने राजीनामा घेतला आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी पूजा चव्हाण हिची आजी शांताबाई राठोड (चव्हाण) यांनी रविवारी (ता.२८) वानवडी पोलिस ठाण्यात केली आहे.

याप्रसंगी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, कांतीलाल गवारे, करुणा लोणारे, दौलतराव शेंडे वानवडी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह सर्वांना चर्चा करण्यासाठी या अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. तृप्ती देसाई यांनी रात्री उशिरा पोलिसांबरोबर चर्चा करण्यास संमती दाखविली.

Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!​

शांताताई राठोड (चव्हाण) यांनी सांगितले की, पूजा चव्हाण हिचा गर्भपात करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे संजय राठोड आणि अरुण राठोड यांच्यासह या प्रकरणातील सर्व गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी. तसेच फिर्यादीमध्ये मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कोणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलीस ठाण्यात आले आहे. पूजाच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. 

आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी राज्यभरात गोंधळ; सरळसेवेची भरती पुन्हा वादात​

शांताताई राठोड म्हणाल्या की, पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलिस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत. जोवर कायद्याचा धाक नाही, तोवर हे असंच वातावरण राहिल. पोलिसांनाही धाक पाहिजे, असं शांताताई यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे पूजा चव्हाणची आजी आणि भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच पूजा चव्हाण यांच्या आजी यांना तुम्ही खरेच नातेवाईक आहात का? याबाबत आपली चौकशी आम्ही का करू नये, असा पोलिसांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Chavans grandmother questioned CM Thackeray about Sanjay Rathod resign