esakal | लोहगाव-वाघोली रस्त्यावर झाले तळे; खासदारांनी घेतली दखल
sakal

बोलून बातमी शोधा

ta.jpg

लोहगाव-वाघोली रस्त्यावर कर्मभूमीनगरजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. गुडघाभर पाणी साचल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

लोहगाव-वाघोली रस्त्यावर झाले तळे; खासदारांनी घेतली दखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी : लोहगाव-वाघोली रस्त्यावर कर्मभूमीनगरजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. गुडघाभर पाणी साचल्याने या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. दरवर्षी ही समस्या निर्माण होत असून, कायमस्वरूपी महापालिकेने या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला 

तसेच येथे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. लोहगाव-वाघोली रस्त्याचा पलीकडील भाग प्रभाग क्रमांक तीन विमाननगर भागात येतो. तर अलीकडील भाग नव्याने समावेश झालेल्या प्रभाग ४२ मध्ये येतो. या रस्त्यावर अद्याप पावसाळी लाईन झाली नाही. लोकप्रतिनिधी या भागाकडे लक्ष देत नाहीत.

त्याचप्रमाणे कर्मभूमीजवळ सखल भाग असल्याने याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नैसर्गिकरित्या पाणी वाहून जाण्याच्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामे झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. सध्या संततधार पावसामुळे पाणी गुडघाभर साचले आहे. येथील अर्धा किमी परिसरात पाणी रस्त्यावर साचले आहे. वाहनचालक, पादचारी नागरिक या पाण्यातूनच वाट काढत जात आहेत.दरवर्षी या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.   पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.

अॅड. सुरेश जाधव म्हणाले, ''दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. रस्त्यावरून येजा करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे.'' 

यासंदर्भात यशवंत शितापे म्हणाले, ''दरवर्षी समस्या आहे, मात्र नगरसेवक, महापालिका अधिकारी लक्ष देत नाही. दरवर्षी तात्पुरती उपाय योजना केली जाते, अन पावसाळ्यात पुन्हा आहे ती समस्या निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी.'' 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

खासदार गिरीष बापट यांनी नुकतीच या परिसराला भेट देऊन ही समस्या पाहिली. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी आपण लक्ष घालून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोहनराव शिंदे, धनंजय जाधव, सुनील खांदवे, दिपक खांदवे, स्वप्नील खांदवे, पांडुरंग खांदवे, दीपक शर्मा, गौतमकुमार, सुजीत बेनाडी आदी उपस्थित होते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 

loading image
go to top