बनावट FB अकांऊटवरून पाठवायचा अश्‍लिल संदेश; शिक्षिकेची आत्महत्या

मानसिक व शारिरीक छळास कंटाळून अखेर शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या
बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामी
बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामीsakal

पुणे : शिक्षिकेच्या पती व त्याच्या मैत्रीणीने शिक्षिकेचे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे तिच्या मैत्रीणींसह नातेवाईकांना अश्‍लिल संदेश पाठवून तिची बदनामी केली. तेवढ्यावरच न थांबता शिक्षिकेचा जाणीवपुवर्क केलेल्या मानसिक व शारिरीक छळास कंटाळून अखेर शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (PUNE News)

दिपाली नितीन गायकवाड (वय 33, रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नितीन वसंत गायकवाड (वय 36) व त्याची मैत्रीण रिया चव्हाण (रा. रामनगर) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिर्यादीचे वडील मारुती यशवंत चव्हाण (वय 62, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 2018 ते 18 सप्टेंबर 2020 या कालावधीत लक्ष्मीनगर येथे घडली आहे.

बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामी
'तुम्ही रडू नका' पराभवानंतर पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी संघाला फोन कॉल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली व नितीन यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दिपाली या एका खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तर पती नितीन गायकवाड हा ठेकदारीची कामे करतो. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पती व त्याची मैत्रिण या दोघांनी दिपाली यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. त्याद्वारे दिपाली यांच्या मैत्रीणी व नातेवाईकांना अश्‍लिल मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली.

"तू मरून जा, तुला आम्ही दोघे कोठेच जगू देणार नाही, तू स्वत:हून जीव देशील,' असे बोलून संशय घेत शिवीगाळ करून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर दिपाली यांनी राहत्या घरात 17 सप्टेंबर 2019 या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दिपाली यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. परंतु, शहरात कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे ते पुन्हा पोलिस ठाण्यात आले नाहीत. काही दिवसांपुर्वी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com