Positive Story : कुटुंबियांसह कोरोनाचं चक्रव्युह भेदणारी 'ती'

कुटुंबाला वाचवायचे असल्याने हतबल होऊन चालणार नाही, असा विचार करून त्यांनी उपचारासाठी जिद्दीने धडपड सुरू केली. मुलगा रुग्णालयात उपचार घेण्यास तयार होईना. त्यामुळे चिंता अधिकच वाढत होती.
Wakale Family
Wakale FamilySakal Media
Summary

कुटुंबाला वाचवायचे असल्याने हतबल होऊन चालणार नाही, असा विचार करून त्यांनी उपचारासाठी जिद्दीने धडपड सुरू केली. मुलगा रुग्णालयात उपचार घेण्यास तयार होईना. त्यामुळे चिंता अधिकच वाढत होती.

मांजरी (पुणे) : सुरुवातीला मुलगा, नंतर पती आणि स्वतःलाही कोरोनाचा संसर्ग होऊनही हिंमत न हारता त्या धीराने लढल्या. ओढाताण, धावपळ झाली. मात्र, मुलगा आणि पतीबरोबर स्वत:ही उपचार घेत त्यांनी कोरोनातून (CoronaVirus) कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. हडपसर (Hadapsar) येथील गोंधळनगर येथील स्नेहलता वाकळे यांनी जिद्दीने कोरोनाला हरवत आपल्या कुटुंबाला वाचवले. (Positive story Wakale family from Pune successfully fight with coronavirus)

श्रीमती स्नेहलता यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तपासणी करून घेतली. त्यामध्ये त्यांना संसर्ग झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर त्यांचा मुलगा सागर (वय ३५) आणि पती नामदेव (वय ६५) यांनीही कोरोनाने गाठले. सागरला चक्कर येऊन रक्ताच्या उलट्या झाल्या. या अगोदरच तो मेंदूच्या विकाराशी लढत असताना कोरोनाशी गाठ पडली. त्यामुळे सर्वचजण घाबरून गेले. स्नेहलताबाईंनी मात्र काळीज घट्ट केले. कुटुंबाला वाचवायचे असल्याने हतबल होऊन चालणार नाही, असा विचार करून त्यांनी उपचारासाठी जिद्दीने धडपड सुरू केली. मुलगा रुग्णालयात उपचार घेण्यास तयार होईना. त्यामुळे चिंता अधिकच वाढत होती.

Wakale Family
अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

दरम्यान, स्नेहलता यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आणि पल्लवी सुरसे यांच्याशी संपर्क साधला. मुलगा ऐकत नाही, त्याला समजून सांगण्यास सांगितले. त्याचा सिटी स्कॅन स्कोर बारा होता. ऑक्सिजन पातळी ऐंशी होती. त्यामुळे त्याला तातडीने ऑक्सिजन बेडची गरज होती. सुरसे यांनी सागरची समजूत काढून हॉस्पिटलची शोधाशोध सुरु केली. डॉ. प्रसाद कुराडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या साई स्पंदन हॉस्पिटलमध्ये सागरवर उपचार सुरू केले. आई स्नेहलता यांनी सागरजवळ थांबून त्याला धीर दिला. देखभाल केली.

काही काळातच स्नेहलता यांचे पती नामदेव वाळके यांचा त्रास वाढू लागला. पुन्हा एकदा धावपळ आणि हॉस्पिटलची शोधाशोध सुरू झाली. पुन्हा एकदा सुरसे दांंपत्याची मदत घेतली. त्यांनी भोसरीतील मिरासाहेब रुपनर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मिळवून दिले. डॉ. दत्ता शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तिकडे मुलगा इकडे पती आणि स्वतःही कोरोनाबाधीत. त्यामुळे स्नेहलताबाईंना मोठ्या संकटाशी सामना करावा लागत होता.

Wakale Family
काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करा; उच्च न्यायालयाचे आदेश

मुलगा आणि पतीच्या देखभालीत स्वतःचा आजार विसरून त्या तारेवरची कसरत करीत होत्या. मुलाला बरे वाटू लागल्यावर त्या पतीच्या देखभालीसाठी भोसरीला गेल्या. स्वत: कोरोनाबाधीत असल्यामुळे त्या पतीबरोबर हॉस्पिटलमध्ये राहू लागल्या. पतीला दिल्या जाणाऱ्या गोळ्या त्यासुद्धा स्वतःसाठी घेऊ लागल्या. पती लघवी किंवा शौचास गेल्यास त्यांचा ऑक्सिजन मास्क स्वतःच्या हाताने स्वतःला लावून उपचार करीत होत्या. पती आणि मुलाबरोबर त्याही उपचार घेऊन सुखरूप घरी परतल्या.

त्यांच्या या लढाईचे, धाडसाचे आणि धीरोदात्त जिद्दीचे सध्या परिसरात कौतुक होत आहे. "एकमेकांना धीर देत, घाबरून न जाता खंबीरपणे सामना केला, तर कोणतेही संकट परतवून लावता येते. मृत्यूच्या दाढेतून पतीला परत आणणारी सावित्री आपणही होऊ शकतो,' असा विश्वास स्नेहलता यांनी बोलताना व्यक्त केला.

Wakale Family
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर दोन वेगवेगळे अपघात; वाहतूक विस्कळीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com