कुटूंबासमोर ठरलो गुन्हेगार ! एचए कॉलनीतील स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांची व्यथा

Possession of houses abandoned by Voluntary retirement workers in the HA colony
Possession of houses abandoned by Voluntary retirement workers in the HA colony

पिंपरी : शहराच्या औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स कंपनी (एचए) मधील स्वेच्छा निवृत्तीधारक कामगारांनी अखेर एचए कॉलनीमधील त्यांच्या घराचा ताबा सोडण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत सुमारे 50 कामगार आणि त्यांच्या कुटूंबांनी घरे सोडली असून उर्वरीत कुटूंबांनी स्वतःचे घर सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. 


दहा वर्ष आधीच सौरडागांचे अनुमान करणे होणार शक्य ; 25 व्या चक्राला सुरवात 

गोरगरीब आणि गरजू रुग्णांना परवडेल अशा स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी पिंपरी येथे शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिला कारखाना एचए कंपनीच्या स्वरुपात उभा राहिला. देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 1954 मध्ये त्याचे उद्‌घाटन झाले. त्यापाठोपाठ एचए कॉलनी देखील वसली. या कॉलनीत राहून कंपनीत काही कामगारांच्या दोन पिढ्यांनी देखील सेवा केली. 


चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....

काही स्वेच्छा निवृत्तीधारक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरातील कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा कामगारांच्याच पुढाकाराने स्थापन झाला. सुरुवातीला 1 हजार कुटूंबांपर्यंत कॉलनीचा विस्तार होता. कामगारांच्या मुलांसाठी एचए स्कूलची स्थापना झाली. 2006 पर्यंत पहिली स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होण्यापूर्वी कॉलनी कामगार आणि त्यांच्या कुटूंबांनी गजबजलेली असायची. कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मनोरजंनासाठी ओपन थिएटर सुरु होते. बहुसंख्य कामगारांची मुले सुरुवातीला याच शाळेत शिकून मोठी झाली. काही कामगारांच्या मुलांनी देखील वडीलांपाठोपाठ एचए कंपनीतच स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली मात्र, 2013 पासून कंपनीला ग्रहण लागले.


पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

कामगारांना पूर्ण पगार मिळेनासे झाले. कामगारांवर जणू आघातच झाला. काही कामगारांनी पगारातील पैसे वाचवून स्वतःचा इतरत्र फ्लॅट घेतला. मात्र, काही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली नाही. तर काही जणांचे वेतनच कमी राहिले. त्यामुळे, अशा कामगारांना आता त्यांचे उर्वरीत जीवन भाड्याच्याच खोलीत जीवन व्यतीत करावे लागणार आहे. 

Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

कुटूंबासमोर गुन्हेगार ठरलो ! 
"गेल्या 25 वर्षांपासून आम्ही कॉलनीत राहत आहोत. माझी 10 ते 15 वर्षांची सेवा शिल्लक होती. मात्र, इच्छा नसतानाही व्हीआरएस स्वीकारावी लागली. नोकरी पूर्ण करु शकलो नाही. आम्ही आमच्या कुटूंबाला न्याय देऊ शकलो नाही. त्यांच्यापुढे आम्ही गुन्हेगार ठरलो'', असे हताश उद्‌गार स्वेच्छानिवृत्तीधारक कामगारांनी यावेळी काढले. 


माओवादी संबंध प्रकरण : अरुण भेलके हा मिलिंद तेलतुंबडेसोबत असत

"एचए कॉलनीमधील घरांसाठी कंपनीकडून सरासरी 1 ते 4 हजार रुपये घरभाडे आकारले जात होते. हे घरभाडे त्यांच्या वेतनामधून वळते करुन घेतले जात असे. सध्या कॉलनीतील 100 स्वेच्छानिवृत्ती धारक कामगारांपैकी निम्म्या कामगार कुटूंबांनी स्वतःच्या घराचा ताबा सोडला आहे.''
- शंकर बारणे, माजी खजिनदार एचए मजदूर संघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com