तोडफोड करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी पोलिसांनी आखली मोहीम; केली 'ही' कारवाई

Pune Police launched a campaign to stop Vehicle Vandalisation
Pune Police launched a campaign to stop Vehicle Vandalisation

पुणे : वर्चस्वाचा वाद, पूर्व वैमनस्य किंवा किरकोळ वादातून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाना जरब बसविण्यासाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशा सराईतांची गुन्हे शाखेने झाडाझडती घेण्यास सुरवात केली आहे.

चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....
 

सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत रविवारी मध्यरात्री गुंडांनी 30 ते 35 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. वारजे भागातही सहा दुचाकींची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या सराईतांवर जरब बसविण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून कोथरूड, अलंकार, सिंहगड रस्ता, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर भागातील तोडफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या 41 जणांची झाडाझडती घेतली. तोडफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईतांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.


पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

''पोलिसांनी विशेष मोहीम राबवून सराईतांची चौकशी केली तसेच त्यांना समज दिली. तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबविली, ''असे त्यांनी नमूद केले. गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोकाशी, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र ढवळे, किरण अडागळे, किशोर शिंदे, दत्तात्रेय गरुड, राहुल घाडगे, दीपक मते, अनिल शिंदे, संतोष क्षीरसागर, संदीप तळेकर आणि विल्सन डिसोझा मोहिमेत सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com