चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

चालकाने दाखविलेल्या घाईमुळे बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत झाली. मोहम्मद उस्मान इनामदार वय 56 असे त्या चालकांचे नाव आहे. स्वारगेट डेपोची बसून ठाण्यावरून पुण्याला येण्यासाठी दुपारी पावणे एक वाजता निघाली होती. विना वाहक असल्याने चालकाच्यावर सर्व जबाबदारी असते. वाकड, हिंजवडी येथील काही प्रवाशांना उतरविले. चांदणी चौकात उतरणाऱ्या पुढे येऊन थांबण्याचा प्रवाशांना सूचना दिली होती. पाषाण तलावाच्या पुढे आल्यानंतर बावधन हद्दीत अचानक वास आल्यामुळे चालक इनामदारांनी बस बाजूला घेतली आणि उतरून पाहिले असता धूर निघत असल्याचे लक्षात आले.

पुणे : भर रहदारीच्या रस्त्यात बसमध्ये आलेल्या वासामुळे चालकाला शंका आली. त्याने गाडी बाजूला घेऊन पाहिले तर गाडीच्या मागील बाजूला धूर दिसला. अन ३५ प्रवाशांना गाडीतून उतरण्याच्या सूचना केल्याने मोठी दुर्घटना टळली.
 

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

चालकाने दाखविलेल्या घाईमुळे बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत झाली. मोहम्मद उस्मान इनामदार वय 56 असे त्या चालकांचे नाव आहे. स्वारगेट डेपोची बसून ठाण्यावरून पुण्याला येण्यासाठी दुपारी पावणे एक वाजता निघाली होती. विना वाहक असल्याने चालकाच्यावर सर्व जबाबदारी असते. वाकड, हिंजवडी येथील काही प्रवाशांना उतरविले. चांदणी चौकात उतरणाऱ्या पुढे येऊन थांबण्याचा प्रवाशांना सूचना दिली होती. पाषाण तलावाच्या पुढे आल्यानंतर बावधन हद्दीत अचानक वास आल्यामुळे चालक इनामदारांनी बस बाजूला घेतली आणि उतरून पाहिले असता धूर निघत असल्याचे लक्षात आले. आग लागली असणार असे त्यांनी सर्वांनी खाली उतरा असे सांगितले. प्रवाशांना खाली उतरवले आणि बसमधील अग्निशामक का सिलेंडरने आग विझवायचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटल्या आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आगीने पेट घेतला आणि पूर्ण गाडी काही क्षणातच पूर्ण जळाली.

इंद्रायणी, सोलापूर एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांची आसनक्षमता वाढली 
 

इनामदार हे मूळचे शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव जवळ यांचे गाव आहे. ते 1991 पासून ते एसटीमध्ये काम करीत आहेत. पंधरा वर्ष सुरक्षित प्रवास असा बिल्ला त्यांना मिळाला आहे. ती पंधरा वर्षे विनाअपघात गाडी चालविल्याचा त्यांना अभिमान आहे.
त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मुलगीचे लग्न झाले आहे. त्यांचे मूळ गावी असलेली इनाम असलेली जमीन शेती करण्यासाठी दुसऱ्याला दिलेली आहे. एका व्यक्तीच्या साडे आठ हजार रुपयांच्या पगारात पूर्णपणे भागात नाही. त्यामुळे काम संपल्यावर घरी जात नाही. स्वारगेटला डेपोत ते झोपतात. डेपोत अंघोळ करून ते कामासाठी दररोज सज्ज होतात. त्यांची पत्नी गावाला भावाकडे असते. 

Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

आगीच्या धुरामुळे त्यांना खोकल्याचा त्रास वाढला आहे. त्यांनी प्रवाशांच्या प्राण वाचविल्याचा कोणताही अहिरभाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. बस जळाल्याचे आर्थिक नुकसान महामंडळाचे झाले असले तरी महंमद इनामदार यांच्या सारख्या कामगारामुळे जीवित हानी न झाल्याने महामंडळाचा फायदा झाला आहे. 

फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने वाहनांच्या रांगा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saves the lives of the passengers due to the drivers presence of mind while burning ST In Pune