पुणेकरांनो, ऑगस्टअखेर पुण्यात दीड लाख रुग्णांची शक्‍यता 

corona patients
corona patients

पुणे - पुण्यात आतापर्यंत सापडलेल्या 50-55 हजार कोरोनाने रुग्णांच्या आकड्यांनी प्रशासनाला नाकीनऊ आणले असतानाच पुढच्या महिन्याअखेर नवे दीड लाख रुग्ण सापडतील, अशी भीती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे गुरुवारी व्यक्त केली. त्यामुळे पुढच्या महिन्यात दोन लाख रुग्णांची नोंद होणार आहे. जेव्हा एवढे रुग्ण सापडतील, तेव्हा त्यांच्यावरील उपचारासाठी महापालिकेपुढे मर्यादा येतील, याचा कागदोपत्री हिशेब दाखवत पुणेकरांना सहकार्य करा, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात आलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी महापौर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा सध्याचे रुग्ण, तिच्या वाढीचा वेग, मृत्यूदर आणि पुढच्या महिनाभरातील संभाव्य रुग्णसंख्या, तिच्या उपचाराची यंत्रणा काय असेल, हेही महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कोरोनाचा प्रसार पाहता पुण्यात सुमारे दोन हजार व्हेंटिलेटर, सात हजार ऑक्‍सिजन बेड, 4 हजार 65 आयसीयू बेडची गरज असल्याकडे महापौर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.महापौर मोहोळ म्हणाले, ""गेली साडेचार महिने उपचारासाठी एक नवा पैसाही कमी पडू दिला. त्यापुढे तो कमी पडणार नाही. मात्र, रुग्णसंख्येचा वेग लक्षात घेता महापालिकेला आर्थिक मर्यादा येतील. त्यामुळे संपूर्ण पुणे सुरक्षित राहावे, यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत करावी. ज्यामुळे पुरेशा प्रमाणात आरोग्य यंत्रणा विस्तारता येणार आहे.'' 

महापालिकेकडे जमा रक्कम (उत्पन्न)  - 4 हजार 443 कोटी 

महसुली खर्च -  3 हजार कोटी 
विकासकामांवरील खर्च  - 1 हजार 400 कोटी 
कोरोनावरील साडेचार महिन्यातील खर्च  - 300 कोटी 
जम्बो सेंटरचा खर्च - 75 कोटी 

कोरोनाचे संकट वाढत असून, त्यातून पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका मजबूत उपाय करीत आहे. महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहून राज्य सरकारने तातडीने मदत करावी. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

(Edited by : Kalyan Bhalerao)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com