esakal | Pune : खासगी रुग्णालयातील सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावा; महापालिकेचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal
खासगी रुग्णालयातील सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावा; महापालिकेचे आदेश

खासगी रुग्णालयातील सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावा; महापालिकेचे आदेश

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी नागरिकांच्या सोईसाठी दर्शनी भागात तेथे मिळणाऱ्या सुविधांचे दरपत्रक लावावेत असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी हे आदेश काढले आहेत.

खासगी रुग्णालयात कोणत्या उपचारासाठी किती शुल्क घेतले जाते याबाबत नागरिकांना काहीच माहिती नसते. त्यामुळे अनेकदा मोठे बिल आले की, हे पैसे जमविण्यासाठी धावपळ करावी लागते. तसेच काही रुग्णालये उपचार करताना वाढीव बिल नातेवाइकांच्या हातामध्ये ठेऊन पैसे भरण्यास सांगतात. त्यावरून वेळप्रसंगी वाद निर्माण झाल्याच्या घटना वारंवार घडतात. कोरोनाच्या काळात अनेक खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा दर आकारल्याचे महापालिकेने केलेल्या आॅडिटमध्ये समोर आले. त्यानंतर आत्तापर्यंत सुमारे ५ कोटी रुपयांचे बिल कमी करण्यात पालिकेला यश आलेले आहे. मात्र, इतर उपचारांच्या बिलावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी रुग्णालयांना दर्शनी भागात शुल्क लावण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती.

हेही वाचा: गरिबांची दिवाळी व्यवस्थित जाऊ द्या ; रेशनकार्डधारकांची सरकारकडे मागणी

राज्य शासनाने नर्सिंग ऍक्टमध्ये सुधारणा करून रुग्णालयांनी त्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. पण पुणे महापालिकेने हे आदेश काढलेले नव्हते. त्यामुळे दरपत्रक लावण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे आरोग्यप्रमुख डॉ. भारती यांनी नुकतेच आदेश काढले आहेत. त्यानंतर पालिकेने हे आदेश काढले आहेत.

रुग्णालयांना ही माहिती लावावी लागणार

रुग्णालयाचे प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर (खात/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रति भेट), सहायक वैद्य शुल्क (प्रति भेट), भूल शुल्क (प्रति भेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहायक शुल्क, भूल सहायक शुल्क (प्रति भेट), शुश्रुषा शुल्क (प्रति भेट),सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क, याव्यतिरिक्त अधिकच्या उपचार सुविधा उपलब्ध असल्यास त्याचे ही दर या बोर्डवर लावण्याचे निर्देश आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी दिले आहेत.

loading image
go to top