ज्युनिअर वकिलांची प्रॅक्‍टिस अद्यापही लॉकडाऊन

 The practice of junior lawyers is still locked down
The practice of junior lawyers is still locked down

पुणे : वकिली सुरू केल्यानंतर चार ते पाच वर्षांची थोडे स्थिर-स्थावर होण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनामुळे त्यावर पाणी फिरले. सध्या केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्याने ज्युनिअर वकिलांना मिळणारी कामे खूपच कमी झाली आहेत. त्यामुळे अद्याप माझी प्रॅक्‍टिस लॉकडाऊन असल्याची खंत वकील रणजितसिंह धुमाळ यांनी व्यक्त केली.

विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऍड. धुमाळ यांनी गेल्याच वर्षी प्रॅक्‍टिस सुरू केली आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या या प्रसंगाला सध्या ऍड. धुमाळप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच ज्युनिअर वकील सामोरे जात आहेत. नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी सुरू होईल, अशी अपेक्षा वकिलांना होती. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आत्ता नोव्हेंबरपर्यंत कामकाज एकाच शिफ्टमध्ये तेही केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे दाव्यांची सुनावणी नियमित होण्यासाठी वकिलांना डिसेंबर उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या वकिलांना वकील संघटनांकडून मध्यंतरीच्या काळात विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ती मदत पुरेशी नसल्याचे वकील सांगतात. त्यामुळे ज्युनिअर वकिलांना पुरेसे विद्यावेतन द्यावे. तसेच लवकरात लवकर न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे झाली अडचण :
नियमित सुनावणी सुरू नसल्याने अनेक दाव्यांमध्ये सध्या काहीच प्रगती नाही. दाव्याचे न्यायालयीन कामकाजच होत नसल्याने वकिलांना पक्षकरांकडून येणारी फी पूर्णतः थांबली आहे. तसेच नवीन दावे दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. तर कमी प्रमाणात काम असल्याने अनेक सीनियर वकिलांनी त्यांच्याकडील ज्युनिअर वकिलांचे काम थांबवले आहे. त्यामुळे सीनियर वकिलांकडून मिळणारा पगार देखील बंद आहे.

अनेकांना दैनंदिन खर्च भागविणेही मुश्‍कील :
उमेदीच्या काळातच कोरोनामुळे प्रॅक्‍टिस थांबल्याने अनेक वकिलांमध्ये सध्या निराशा आली आहे. दोन-तीन वर्ष प्रॅक्‍टिस झाल्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशांतून अनेकांनी घर, वाहन घेतले. आता त्यांना त्या वस्तूंचे इएमआय भरणे देखील अवघड झाले आहे. घरखर्चाच्या तुलनेत येणारे उत्पन्न फारच कमी झाल्याने पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com